शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दाद कुणाला मागायची?

By admin | Updated: July 23, 2015 04:41 IST

विठ्ठलनगर झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना २०१०-२०११ या कालावधीमध्ये पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीमध्ये घरांचा ताबा दिला. तेव्हापासून

विठ्ठलनगर झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना २०१०-२०११ या कालावधीमध्ये पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीमध्ये घरांचा ताबा दिला. तेव्हापासून त्या इमारतीतील रहिवाशांना उणिवा जाणवू लागल्या.या इमारतीचे बांधकाम आरसीसी पद्धतीचे आहे. वाळू व ढस यांचा वापर केल्यामुळे बांधकाम मजबूत नाही. तसेच, पावसाळ्यामध्ये सातव्या मजल्यावर पाणी झिरपत असते. तसेच काही काही इमारतींमध्ये वरच्या मजल्यावरील बाथरूम किंवा स्वच्छतागृहामधून खाली राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये पाणी गळते. पावसाळ्यामध्ये टेरेसवरून पावसाचे पाणी खाली साचते. तसेच, सात मजली बिल्डिंगसाठी ड्रेनेजलाइन थोडी मोठी करण्याची आवश्यकता होती. तसेही झाले नाही. कधी कधी ड्रेनेजमध्ये कचरा अडकून ड्रेनेज बंद पडते. तसेच, पुनर्वसन प्रकल्प करताना ज्या लोकांची दुकाने आहेत, त्यांना इमारतीमध्ये गाळे देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, अद्यापपर्यंत एकही गाळा बांधण्यात आला नाही. तसेच, काही दुकानदारांनी दुसऱ्याच्या घरामध्ये दुकाने चालू केली आहेत. तरी, दुकानदारांना गाळे देण्याचे आश्वासन फोल ठरले आहे.तसेच, विठ्ठलनगर तीन बालवाड्या आहेत. त्यांचे पुनर्वसन कसे करायचे, तसेच विठ्ठलनगर पुनर्वसन इमारतीच्या मोकळ्या जागेमध्ये मुलांसाठी बगिचा बनवण्याचे नियोजन होते. तेही झाले नाही. तसेच, विठ्ठलनगरमधून बाहेर पडण्यास एकच रस्ता असल्याने त्या रस्त्यावरून सर्व वाहनांना जावे लागते. तसेच, चारी बाजूंनी सीमाभिंत असल्याने दुसरा कोणता रस्ताही काढता येत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांच्या मनामध्ये आपण कोंडवाड्यात असल्यासारखी स्थिती निर्माण होते.विठ्ठलनगर परिसरात वयस्कर लोकांची संख्याही खूप असल्याने सातव्या मजल्यावर राहणाऱ्या वयस्कर लोकांची दमछाक होते. इमारतीमधील लिफ्ट दिवसभर चालवणे वीजबिलामुळे परवडत नाही. लिफ्ट फक्त सकाळी तीन तास, संध्याकाळी चार तास चालू असते. तसेच, लिफ्ट बंद पडल्यामुळे वयस्कर लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. (वार्ताहर)