पिंपरीत पोटच्या ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याकडून लज्जास्पद कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 17:03 IST2021-10-17T17:02:42+5:302021-10-17T17:03:36+5:30

तू मोठी झाली आहे का, मला बघायचे आहे, असे म्हणून जन्मदात्या ४५ वर्षीय पित्याने पोटच्या ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

11-year-old girl sexually abused in pimpri chinchwad | पिंपरीत पोटच्या ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याकडून लज्जास्पद कृत्य

पिंपरीत पोटच्या ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याकडून लज्जास्पद कृत्य

ठळक मुद्देपत्नीने विचारणा केली असता पत्नी आणि मुलीला केली मारहाण

पिंपरी : तू मोठी झाली आहे का, मला बघायचे आहे, असे म्हणून जन्मदात्या ४५ वर्षीय पित्याने पोटच्या ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच पत्नीने जाब विचारला असता, तिला व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली. वाकड येथे १४ ऑक्टोबर २०२१ पूर्वी सहा महिन्यांपासून ही घटना घडली. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पित्याने त्याच्या ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलीने विरोध केला असता त्याने मुलीला मारहाण केली. तू मोठी झाली आहे का, मला बघायचे आहे, असे म्हणून नराधम आरोपीने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल. त्यामुळे मुलीच्या आईने पतीला याप्रकरणी विचारणा केली. त्यानंतर आरोपीने पत्नी आणि पीडित मुलीला मारहाण केली. तू जर कोणाला काहीही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना मारून टाकेल, अशी धमकी आरोपीने दिली. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने वाकड पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Web Title: 11-year-old girl sexually abused in pimpri chinchwad