पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:58 IST2026-04-27T11:53:29+5:302026-04-27T11:58:25+5:30

पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या महत्त्वाच्या सदस्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

LeT Commander Sheikh Yousuf Afridi Shot Dead by Unknown Gunmen in Pakistan | पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य

पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य

Sheikh Yousuf Afridi Shot Dead: दहशतवाद्यांच्या आश्रयासाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवाद्यांना लक्ष केले जात आहे. भारताचा कुख्यात शत्रू आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा अत्यंत जवळचा सहकारी शेख युसूफ आफ्रिदी याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात ही घटना घडली असून, या हत्येमुळे दहशतवादी संघटनांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख युसूफ आफ्रिदीवर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. आफ्रिदीला पळून जाण्याची कोणतीही संधी मिळणार नाही, अशा पद्धतीने हल्ला करण्यात आला. बऱ्याच गोळ्या लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तपास यंत्रणांच्या मते, हा एक पूर्वनियोजित आणि अत्यंत विचारपूर्वक केलेला हल्ला होता.

हाफिज सईदचा उजवा हात

युसूफ आफ्रिदी हा लष्कर-ए-तोयबाचा साधा कार्यकर्ता नव्हता. तो उत्तर-पश्चिम पाकिस्तानमधील या संघटनेच्या नेटवर्कचा मुख्य सूत्रधार मानला जायचा. २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा तो अत्यंत विश्वासू सहकारी होता. आफ्रिदीच्या मृत्यूमुळे लष्कर-ए-तोयबाचे मोठे नुकसान झाले आहे.

अज्ञात हल्लेखोरांचे सत्र सुरूच

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना टार्गेट करण्याचे सत्र सुरू आहे. या घटनांच्या पॅटर्नवर नजर टाकल्यास धक्कादायक आकडेवारी समोर येते. २०२६ मध्ये आतापर्यंत जवळपास ३० दहशतवादी किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना लाहोर, कराची आणि इतर शहरांत टार्गेट करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात लष्करचा सह-संस्थापक आमिर हमझा याच्यावर लाहोरमध्ये गोळीबार झाला होता, ज्यात तो थोडक्यात बचावला. त्याआधी हाफिज सईदचा आणखी एक जवळचा सहकारी अबू कतल याची झेलममध्ये हत्या करण्यात आली होती. तो २०२४ च्या रियासी दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा मोठा भाऊ मुहम्मद ताहिर अन्वर याचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे.

दहशतवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण

लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांचे मोठे नेते आता पाकिस्तानमध्ये उघडपणे फिरण्यास घाबरत आहेत.

Web Title : पाकिस्तान में लश्कर-ए-तोयबा के युसूफ अफ्रीदी की हत्या; कई निशाने पर।

Web Summary : पाकिस्तान के खैबर पख्तूनख्वा में लश्कर-ए-तोयबा के हाफिज सईद के करीबी सहयोगी युसूफ अफ्रीदी की गोली मारकर हत्या कर दी गई। पाकिस्तान में आतंकवादियों की लक्षित हत्याओं की श्रृंखला जारी है, हाल ही में 30 से अधिक घटनाएं हुई हैं, जिससे आतंकी समूहों में डर है।

Web Title : Lashkar-e-Taiba's Yusuf Afridi Killed in Pakistan; Dozens Targeted.

Web Summary : Lashkar-e-Taiba's Yusuf Afridi, a close aide of Hafiz Saeed, was shot dead in Pakistan's Khyber Pakhtunkhwa. This follows a series of targeted killings of militants in Pakistan, with over 30 such incidents reported recently, creating fear among terror groups.