बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीवर WWE सुपरस्टार जॉन सिना फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:44 AM2019-09-25T11:44:21+5:302019-09-25T11:47:15+5:30

प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण आदी अनेक बॉलिवूड अभिनेंत्रींचे फॅन जगभरात आहेत. पण, WWE च्या रिंगणात यांची कधी चर्चा झाल्याची ऐकिवात नाही. प्रियांका आणि दीपिका यांच्यावर कुरघोडी करत बॉलिवूडची एक अभिनेत्री WWEचा सुपरस्टार जॉन सिनाचा क्रश बनली आहे.

जॉन सिनानं 16 वेळा WWE चॅम्पियनशिप जिंकली आहे आणि भारतात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. पण, जॉन सिना हा भारतातील एका बॉलिवूड अभिनेत्रीचा चाहता आहे आणि त्यानं त्याची कबुलीही दिली आहे.

अमेरिकेचा हा व्यावसायिक कुस्तीपटू अभिनेता, गायक आणि अँकर अशा विविध भूमिकेतही आपल्याला अनेकदा दिसला आहे. सध्या तो Are You Smarter Than a Fifth Grader? या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे.

जॉन सिना आपल्या ट्विटर हँडलवर केवळ तीनच भारतीयांना फॉलो करत आहे आणि त्यात त्या बॉलिवूड अभिनेत्रीचा समावेश आहे.

जॉन सिना ज्या बॉलिवूड अभिनेत्रीवर फिदा झाला आहे तिचे नाव आलिया भट्ट आहे.

जॉन सिनाला आलिया भट्टचा अभिनय फार आवडतो.

आलियानं करण जोहरच्या स्टुडंट ऑफ दी इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले.