गौरवशाली इतिहास असणारा चुनारचा किल्ला, एकदा नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 02:49 PM2020-02-29T14:49:44+5:302020-02-29T15:06:48+5:30

टिव्हीवरील मालिका चंद्रकांता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. या मालिकेत उल्लेख असलेल्या चुनारच्या किल्लाबदद्ल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळ मिर्झापूर आहे. या ठिकाणापासून ३५ किलोमीटरच्या अंतरावर गंगेच्या किनारी चुनार चा किल्ला वसलेला आहे. टॅकोर परिसरात हा किल्ला प्रमुख आकर्षण आहे.

अनेक पौराणिक कथांमध्ये या किल्ल्याचा संदर्भ दिसून येतो. विक्रमादित्यने आपला भाऊ भर्तृहरी यांच्यासाठी हा किल्ला तयार केला होता. या किल्लात ५२ खांब तसंच एक सुर्यघडी सुद्धा आहे.

स्थानिक लोकांच्यामते जेव्हा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा या किल्ल्यातील लोकांनी शरणागती पत्करली.

गंगेच्या परिसरात हा किल्ला आहे. हजारो वर्ष जुना असलेल्या या किल्ल्याचा जिर्णोद्धार राजा विक्रमादित्य यांनी केला होता.

अनेक पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.

जर तुम्हाला या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर जवळचं असलेलं विमानतळ वाराणसी हे आहे. नंतर तुम्ही रस्त्याने चुनारपर्यंत पोहचू शकतात.

मिर्जापुर नॅशनल हायवेपासून तुम्हाला या ठिकाणी सहज येता येईल. वाराणसीवरून बस सुद्धा उपलब्ध होतात.

त्या किल्ल्याला अनेक दालनं आहेत. किल्ल्यामध्ये वेगळं महत्व प्राप्त असेलल्या या किल्ल्याला नक्की भेट द्या.