IRCTC चे शानदार टूर पॅकेज! स्वस्तात नॉर्थ ईस्ट फिरण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 11:06 AM2023-01-13T11:06:13+5:302023-01-13T11:42:44+5:30

IRCTC : ही टूर 18 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे.

मुंबई : ईशान्येकडील राज्ये आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी देशभर ओळखली जातात. मेघालय आणि आसामसारख्या राज्यात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आसाम, मेघालय यांसारख्या राज्यांना भेट द्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेच्या शानदार टूर पॅकेजची माहिती देत ​​आहोत.

या पॅकेजद्वारे तुम्हाला शिलाँग, चेरापुंजी, मव्ल्य्न्नोंग, काझीरंगा आणि गुवाहाटी येथे जाण्याची संधी मिळेल. ही टूर 18 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे. यामध्ये तुम्हाला 7 दिवस आणि 6 दिवसांच्या टूरची सुविधा मिळेल.

हे पॅकेज मुंबईपासून सुरू होणार आहे. हे एक फ्लाइट पॅकेज आहे, ज्यामध्ये तुम्हाला मुंबई ते गुवाहाटी परतीचे विमान तिकीट मिळणार आहे.

या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला रात्री राहण्यासाठी हॉटेलची सुविधाही मिळणार आहे.

या टूर पॅकेजमध्ये एका व्यक्तीला प्रवास करण्यासाठी 55,300 रुपये, दोन व्यक्तींसाठी 45,000 रुपये आणि प्रवास करणाऱ्या तीन व्यक्तींसाठी 42,700 रुपये शुल्क द्यावे लागेल.