तंत्रज्ञानाची किमया! आता फोन बंद असतानाही करता येणार मेसेज, WhatsApp ने आणलं कमाल फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 03:21 PM2022-08-17T15:21:26+5:302022-08-17T15:28:47+5:30

Whatsapp Windows Native App : WhatsApp ने आपलं नवीन व्हॉट्सअ‍ॅप विंडोज अ‍ॅप (WhatsApp Windows Native App) लाँच केलं आहे.

WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते आपल्या युजर्स चॅटिंग आणखी गंमतीशीर व्हावं म्हणून नवनवीन फीचर्स आणत असतं. आताही आपल्या युजर्ससाठी चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी दमदार नवीन फीचर्स आणले आहेत. सातत्याने आपल्या युजर्सना नवीन सुविधा देत असून आता आणखी एका जबरदस्त सुविधेची घोषणा केली आहे.

WhatsApp ने बुधवारी आपलं नवीन व्हॉट्सअ‍ॅप विंडोज अ‍ॅप (WhatsApp Windows Native App) लाँच केलं आहे. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप फक्त व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या मदतीने लॅपटॉपमध्ये वापरता येत होतं. परंतु या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही आता लॅपटॉपवर अगदी आरामात व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकणार आहात.

विंडोज नेटिव्ह अ‍ॅपची अधिकृत घोषणा करताना व्हॉट्सअ‍ॅपने दिलेल्या माहितीनुसार, या अ‍ॅपमध्ये विश्वासार्हता आणि वेग दोन्ही वाढवलं ​​जातील. युजर्स त्यांचा फोन ऑफलाईन असतानाही विंडोज आणि मॅक लॅपटॉपमध्ये WhatsApp सूचना आणि मेसेजचा वापरू शकतील. कंपनीनं सांगितलं की, या अ‍ॅपद्वारे युजर्सना फोन क्यूआर कोडनं स्कॅन करून लॉग इन करता येईल.

आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपचे हे विंडोज नेटिव्ह अ‍ॅप मॅकसाठी डेव्हलपमेंटच्या टप्प्यात आहे, त्याची फक्त बीटा आवृत्ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे अ‍ॅप विंडोजसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. युजर्स मायक्रोसॉफ्ट अ‍ॅप स्टोअरवरून विंडोज नेटिव्ह अ‍ॅप डाउनलोड करू शकतात.

Windows आणि Mac लॅपटॉपमध्ये WhatsApp नेटिव्ह अ‍ॅपवर लॉग इन करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनवर WhatsApp उघडावं लागेल, त्यानंतर आय (i) बटणावर टॅप करा आणि लिंक डिव्हाइस ऑप्शनवर जा. यानंतर येथून विंडोज आणि मॅक लॅपटॉपच्या व्हॉट्सअ‍ॅप नेटिव्ह अ‍ॅपचा क्यूआर कोड फोनवरून स्कॅन करण्याचा पर्याय येतो.

एकदा स्कॅन केल्यावर तुम्ही Windows आणि Mac लॅपटॉपवर WhatsApp सूचना आणि मेसेज अ‍ॅक्सेस करू शकता. यानंतर तुमचा फोन ऑफलाईन असला तरी तुम्ही लॅपटॉपमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकता. याचा युजर्सना मोठा फायदा होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. Meta चे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत आपल्या युजर्ससाठी आकर्षक फीचर्स आणण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याच्या मदतीने युजर्सना अ‍ॅप वापरणे सोपे होईल. WhatsApp हे सर्वांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झालं आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी हे लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.

तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसह WhatsApp ग्रुपवर आहात परंतु त्यांच्या फॉरवर्ड मेसेजमुळे त्रासलेले आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला बळजबरीने कोणत्याही WhatsApp ग्रुपमध्ये राहण्याची गरज नाही. WhatsApp च्या नवीन फीचर अंतर्गत तुम्ही आता असे WhatsApp ग्रुप्स गुपचूप सोडू शकता.

लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन काही नवीन फीचर्स सादर करणार आहे. यामध्ये तुम्ही आता तुमचं ऑनलाईन स्टेटस इंडिकेटर लपवू शकाल. याचा अर्थ आता तुम्ही ऑनलाईन आहात की नाही हे कोणालाही कळणार नाही. दुसर्‍या फीचरमध्ये तुम्ही आता ठराविक मेसेजचे स्क्रीनशॉट ब्लॉक करू शकाल. म्हणजे तुमच्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही.

या फीचर अंतर्गत, तेच युजर्स तुम्हाला ऑनलाईन पाहू शकतील ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचा 'ऑनलाईन' स्टेटस इंडिकेटर शेअर करू इच्छिता. या फीचरची खास गोष्ट म्हणजे आता तुम्हाला फक्त तेच लोक ऑनलाईन दिसतील ज्यांना तुम्ही दाखवू इच्छिता. नवीन फीचरमध्ये, WhatsApp युजर्सना ही सुविधा प्रदान करेल ज्यासाठी त्यांना ऑनलाइन राहायचे आहे आणि कोणासाठी त्यांना ऑफलाइन स्थिती दर्शवायची आहे. या महिन्यात हे फीचर आहे.