'या' Mobiles वर १ नोव्हेंबरपासून Whatsapp होणार बंद; तुमच्याकडे आहे का ते डिव्हाईस?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 10:37 AM2021-10-25T10:37:04+5:302021-10-25T10:47:55+5:30

Whatsapp on Mobile : १ नोव्हेंबरपासून काही Mobiles वर Whatsapp होणार बंद.

अलीकडेच फेसबुकच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने फेसबुकसह व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम या तीनही सेवा काही तासांसाठी बंद पडल्या होत्या. त्यावेळी जगभरातील अब्जावधी वापरकर्त्यांच्या जिवाची घालमेल झाली होती.

सेवा पूर्ववत झाल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. व्हॉट्सॲप तर जीवनावश्यकच बनले आहे. हेच व्हॉट्सॲप १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहेत.

सॅमसंग आणि ॲपल या कंपन्यांच्या काही मोबाइलवर व्हॉट्सॲप दिसणार नाही. सॅमसंगच्या गॅलेक्सी ट्रेंड लाइट, गॅलेक्स एसआयआय, गॅलेक्सी ट्रेंड टू, गॅलेक्सी एस३ मिनी, कोअर, एक्सकव्हर२, ऑप्टिमस एल५ डबल अशा २६ स्मार्टफोन्सवर व्हॉट्सॲप निष्क्रिय होईल.

ॲपलच्या आयफोन ६एस, ६ एस प्लस, ॲपल आयफोन एसई (फर्स्ट जनरेशन) आणि ह्युवेई कंपनीचे मोबाइल, तसेच कंम्प्युटरच्या व्हॉट्सॲप वेब व्हर्जनमध्येही काही तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे.

१ नोव्हेंबरपासून अनेक जुन्या अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइलवर व्हॉट्सॲप सुरू राहणार नाही. त्यामुळे जगभरातील लक्षावधी वापरकर्त्यांच्या मोबाइलवर व्हॉट्सॲप निष्क्रिय झाल्याचे दिसेल.

गेल्या काही वर्षांत व्हॉट्सॲपमध्ये अनेक बदल झाले असून नवनवीन फीचर्स त्यात आले आहेत. व्हॉट्सॲपमध्ये अलीकडे आलेले नवे फीचर्स जुन्या अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइलवर नीट चालत नाही. त्यातील तंत्रज्ञान अपुरे पडते.

तसेच या जुन्या मोबाइलवर वापरकर्त्यांच्या डेटाला संरक्षण देणे व्हॉट्सॲपला जमेनासे झाले आहे. म्हणूनच १ नोव्हेंबरपासून या जुन्या मोबाइलवर व्हॉट्सॲप निष्क्रिय होणार आहे.

सेटिंग टॅब उघडा. त्यावर अबाऊट फोन हा पर्याय निवडा. तिथे चेक अपडेट्स हा पर्याय असेल. नवीन ऑपरेटिंग सिस्टीमचा पर्याय असेल तर इन्स्टॉल नाऊ क्लिक करा. आयफोन अपडेट करूनही ही तांत्रिक अडचण दूर करता येईल.

फक्त आयफोन त्यावेळी प्लग्डइन असावा. सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर व्हॉट्सॲप या सर्व मोबाइलमध्ये सुरूच राहील.

Read in English