WhatsApp Status मध्ये होणार मोठा बदल, आता व्हॉईस नोट्स ठेवता येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 03:34 PM2022-07-14T15:34:59+5:302022-07-14T15:42:25+5:30

WhatsApp : युजर्सचा इन्स्टंट मेसेजिंग अनुभव सुधारण्यासाठी अॅप नेहमीच नवनवीन काम करत असते.

व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणत असते. युजर्सचा इन्स्टंट मेसेजिंग अनुभव सुधारण्यासाठी अॅप नेहमीच नवनवीन काम करत असते. अलीकडेच त्यावर मेसेज रिअॅक्शन फीचर आले आहे. यापूर्वी, या फीचरमध्ये फक्त 6 इमोजी उपलब्ध होते, ज्यात कंपनी आता वाढ करणार आहे.

दरम्यान, व्हॉईस नोट स्टेटस फक्त तुम्हाला हव्या असलेल्या लोकांसोबत शेअर करता येईल. म्हणजेच स्टेटससाठी तुम्ही जे काही सेटिंग सेट केले आहे, ते तुम्हाला व्हॉईस नोटही दिसेल. व्हॉईस नोट देखील फोटो, संदेश आणि व्हिडिओ सारख्या एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील.

व्हॉट्सअॅप फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने ही माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप अखेर स्टेटसमध्ये व्हॉईस नोट्सला सपोर्ट करणार आहे.

कदाचित कंपनी हे फीचर व्हॉईस स्टेटस नावाने लॉन्च करू शकते. Wabetainfo ने या फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. रिपोर्टनुसार, स्टेटस टॅबच्या तळाशी एक नवीन पर्याय लवकरच उपलब्ध होईल, ज्याच्या मदतीने यूजर स्टेटसवर व्हॉईस नोट अपलोड करू शकतील.

दरम्यान, व्हॉईस नोट स्टेटस फक्त तुम्हाला हव्या असलेल्या लोकांसोबत शेअर करता येईल. म्हणजेच स्टेटससाठी तुम्ही जे काही सेटिंग सेट केले आहे, ते तुम्हाला व्हॉईस नोटही दिसेल. व्हॉईस नोट देखील फोटो, संदेश आणि व्हिडिओ सारख्या एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील.

मात्र, हे फीचर अद्याप आपल्या डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. आतापर्यंत हे फीचर बीटा टेस्टर्सपर्यंत पोहोचलेले नाही. यासोबतच कंपनी इतर अनेक फीचर्सवर काम करत आहे. लवकरच तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर मल्टी डिव्हाईस सपोर्ट सारखा कंपेनियन मोड मिळेल.

हे फीचर आणल्यानंतर यूजर्स एकाच वेळी दोन स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप अकाउंट वापरू शकतील. सध्या युजर्स एकावेळी एकाच फोनवर व्हॉट्सअॅप वापरू शकतील. मात्र, हे फीचर कधी येणार याची माहिती नाही.