अरे व्वा! WhatsApp वर आलं 'हे' भन्नाट फीचर; चॅटिंगची गंमत आता आणखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 05:12 PM2021-05-28T17:12:40+5:302021-05-28T17:29:03+5:30

Whatsapp New Voice Message : व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळीही असंच एक जबरदस्त फीचर आणलं असून यामुळे चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप सध्या आपल्या नव्या पॉलिसीमुळे चर्चेत आहे. अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र याच दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी एक नवीन भन्नाट फीचर आणलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळीही असंच एक जबरदस्त फीचर आणलं असून यामुळे चॅटिंगची गंमत आणखी वाढणार असल्याची माहिती मिळत आहे.

WhatsApp वेळोवेळी अपडेट्स घेऊन येत आहे. आता या अपडेटनंतर WhatsApp वर Voice Message ला वेगवेगळ्या प्लेबॅक स्पीडवर प्ले केले जाऊ शकते. या अपडेटला अँड्रॉईड सोबत आयफोन युजर्संसाठी देखील जारी केले जात आहे. याबाबत आणखी जाणून घेऊया...

WhatsApp चे हे फीचर WhatsApp Web आणि डेस्कटॉप क्लाइंट्सवर सुद्धा प्ले करता येऊ शकणार आहे. यावरून तुम्ही व्हाईस मेसेजला प्लेबॅक स्पीडला 1.0X, 1.5X आणि 2.0X पर्यंत वाढवता येऊ शकते.

WhatsApp वर तुम्हाला व्हाईस मेसेज मिळाला की त्याला प्लेबॅक स्पीड बटणने त्याचा स्पीड तुमच्यानुसार वाढवू शकता. या नवीन अपडेटमध्ये WhatsApp कडून नवीन स्टिकर पॅक Laugh It Off ला जारी करण्यात आले आहे.

28 एनिमेटेड स्टिकर्सचा यामध्ये समावेश आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार, स्टिकर सिलेक्ट करू शकता. Laugh It Off स्टिकर पॅकला iPhone आणि Android दोन्ही युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे.

WhatsApp च्या या नवीन फीचर्सचा वापर करण्यासाठी तुम्हाला अँड्रॉईड व्हर्जन 2.21.9.15 आणि WhatsApp iOS व्हर्जन 2.21.100 डाउनलोड करावे लागणार आहे. तुम्हाला यात प्लेबॅक स्पीड टॉगलचा पर्याय दिला जाणार आहे.

तुम्ही स्पीडला वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या हिशोबानुसार, 1x to 1.5x आणि 2x वर स्विच करू शकता. हे टॉगल ऑडियो सीकबार समोर उपलब्ध होणार आहे. आता प्लेबॅक स्पीडच्या स्वीचवर टॅप केल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या स्पीडमध्ये व्हाइस मेसेजला कंट्रोल करू शकते.

नवीन फीचर्सला WhatsApp Web आणि डेस्कटॉप व्हर्जन 2.119.6 वर युज करू शकता. WhatsApp वर सतत नवनवीन फीचर येत असून ते युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच फ्लॅश कॉल (Flash Call) नावाच्या नवीन फीचरवर काम सुरु केले आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग-इन करण्याचा प्रयत्न केल्यावर युजर्सना त्यांचा फोन नंबर व्हेरिफाय करण्याची परवानगी मिळणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या फ्लॅश कॉल या नवीन फीचरला आपल्या फोनच्या कॉल लॉगमध्ये प्रवेश करण्यासाठी युजर्सची परवानगी आवश्यक आहे. हे नवं फीचर Appच्या अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.21.11.7 वर पाहिले आहे.

अहवालात दिलेल्या स्क्रीनशॉटनुसार, फ्लॅश कॉल एक पर्यायी फीचर असणार आहे. जे युजर्स आपल्या आवडीनुसार वापरू शकतील. यामध्ये त्यांना फ्लॅश कॉलसाठी त्यांच्या कॉल लॉगवर व्हॉट्सअ‍ॅपला एक्सेस द्यायचा आहे की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल.

व्हॉट्सअ‍ॅपचं फ्लॅश कॉल एक चांगलं फीचरआहे. WhatsApp ने स्वतःच सध्या सुरू असलेल्या फसवणुकीविषयी युजर्सना सतर्क केले आहे. ज्यामध्ये सायबर क्रिमिनल्स युजर्सना कंपनीचे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात आणि त्यांना मेसेज पाठवतात आणि त्यांना पुन्हा ओटीपी शेअर करण्यास सांगतात.

युजर्सला हा मेसेज टेक्स्टद्वारे पाठवला जातो. जर तुम्ही एखाद्याला हा मेसेज दिल्यास त्या व्यक्तीला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपचा अ‍ॅक्सेस मिळतो. यानंतर यूजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट लॉक होते व हॅकर्सचा वापर गुन्हेगारी गोष्टींसाठी करतात.

सोशल मीडियावर एका यूजर्सने सांगितले की त्याच्या कुटुंबातील 3 व्यक्तींनी अशाप्रकारे अकाऊंटचा अ‍ॅक्सेस गमावला आहे. हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅपवरून एक व्हेरिफाय कोड आणि मेसेज पाठवतात. ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने त्या कोडची खूपच आवश्यकता असल्याचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज केला जातो. अशात तुम्ही हा कोड पाठवू नये व लिंकवर देखील क्लिक करू नये.

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सला फसवणुकीच्या या नवीन पद्धतीपासून सावध राहायला हवे. कारण, याद्वारे सायबर गुन्हेगार लोकांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करत आहेत. जर व्यक्तीला वन टाइम पिन कोड मेसेज प्राप्त होत असेल, तर सावध होणे गरजेचे आहे. व्हॉट्सअ‍ॅप फ्रॉडला सुरुवात होते. कोणीही कितीही ओळखीचे असले तरीही कोड कोणाला शेअर करू नये, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.