Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

२१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात काही खास झाली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 10:36 PM2024-05-18T22:36:06+5:302024-05-18T22:36:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : Glenn Maxwell dismissed Ruturaj Gaikwad on a golden duck, see Anushka Sharma reactions, Video     | Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात काही खास झाली नाही. फिरकीला पोषक खेळपट्टीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ग्लेन मॅक्सवेलला पहिले षटक दिले. त्याने पहिल्याच चेंडूवर CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला माघारी पाठवले. ऋतुच्या विकेटनंतर स्टेडियमव दणाणून गेले आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही जोरदार सेलिब्रेशन करताना दिसली. बाजूलाच असलेली श्रेयांका पाटीलही प्रचंड खूश झाली. 

OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी RCB ने मोठी धावसंख्या उभी केली. विराट कोहली ( ४७) व फॅफ ड्यू प्लेसिस ( ५४) यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावा चोपल्या. पण, CSK चे फिरकीपटू मिचेल सँटनर ( १-२३) व महिशा तीक्षणा ( ०-२४) यांनी सुरेख मारा करून मधल्या षटकांत धावांची गती संथ केली होती. पण, कॅमेरून ग्रीन व रजत पाटीदार यांनी २८ चेंडूंत ७१ धावा चोपून RCB ला मोठी धावसंख्या उभारून दिला.  पाटीदार २३ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावांवर झेलबाद झाला. दिनेश कार्तिक ( ६ चेंडूंत १४ धावा )  आणि ग्लेन मॅक्सवेल ( ५ चेंडूंत १६ धावा) यांनी झटपट धावा केल्या. ग्रीन १७ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला आणि बंगळुरूने ५ बाद २१८ धावा केल्या. 

Image
शार्दूल ठाकूरने ४ षटकांत ६१ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडेनेही ४ षटकांत ४९ धावा देऊन १ विकेट मिळवला. रवींद्र जडेजाने ३ षटकांत ४० धावा दिल्या. बंगळुरूला हा सामना १८ धावांनी जिंकावा लागेल, तर ते नेट रन रेटच्या जोरावर चेन्नईला मागे टाकून प्ले ऑफमध्ये जातील. ग्लेन मॅक्सवेलने पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडची विकेट मिळवून CSK ला मोठा धक्का दिला. RCB विरुद्ध गोल्डन डकवर बाद होणारा ऋतुराज तिसरा कर्णधार ठरला. यापूर्वी २००९ मध्ये ब्रेंडन मॅक्युलम आणि २०११ मध्ये अॅडम गिलख्रिस्ट असे पहिल्याच चेंडूवर बाद झाले होते. डॅरिल मिचेलही ( ४) यश दयालच्या गोलंदाजीवर विराटच्या हाती झेल देऊन परतला. चेन्नईला २.२ षटकांत १९ धावांवर दुसरा धक्का बसला.  



 

Web Title: IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : Glenn Maxwell dismissed Ruturaj Gaikwad on a golden duck, see Anushka Sharma reactions, Video    

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.