Coronavirus : भारीच! WhatsApp चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, 'लॉकडाऊन स्पेशल' स्टिकर्स पाठवता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 03:01 PM2020-04-22T15:01:23+5:302020-04-22T15:23:54+5:30

Coronavirus : व्हॉट्सअ‍ॅपने ‘Together at Home'  चे स्टिकर पॅक लाँच केलं आहे. यासाठी कंपनीने जागतिक आरोग्य संघटनेसोबत हात मिळवणी केली आहे. 

देशात कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. घरबसल्या इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. 

घरात बसून राहावे लागत असल्याने अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्हिडीओ कॉल केले जात आहेत. आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. 

WhatsApp चॅटिंगची गंमत आता आणखी वाढणार आहे. युजर्सना 'लॉकडाऊन स्पेशल' स्टिकर्स पाठवता येणार असून यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने खास स्टिकर पॅक आणला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने ‘Together at Home'  चे स्टिकर पॅक लाँच केलं आहे. यासाठी कंपनीने जागतिक आरोग्य संघटनेसोबत हात मिळवणी केली आहे. 

लॉकडाऊनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना या खास स्टिकर्सच्या माध्यमातून भावनांना व्यक्त करता येणार आहेत.

सध्या हे स्टिकर्स इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. मात्र लवकरच कंपनी अन्य भाषेत लाँच करण्याची शक्यता आहे.

‘Together at Home' चे स्टिकर पॅक भन्नाट असून लॉकडाऊनमधील भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. 

व्हॉट्सअ‍ॅपचा हा स्टिकर पॅक खूप मजेशीर आहे. युजर्सना या पॅकमधून आपल्या भावना मोकळ्या करता येणार आहेत.

'लॉकडाऊन स्पेशल' स्टिकर पॅकमधील एका स्टिकरमध्ये व्यक्ती लॅपटॉपसोबत दाखवण्यात आली आहे. 

वर्क फ्रॉम होम करतानाचा स्टिकर मस्त असून सोशल डिस्टंसिंगसाठीही या पॅकमध्ये खास स्टिकर देण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचा हा नवा स्टिकर पॅक व्हॉट्सअ‍ॅपमध्ये उपलब्ध असून फ्री मध्ये डाऊनलोड करता येतो.

आता चॅटिंग करताना भरपूर मजा येणार असून WhatsApp चा 'लॉकडाऊन स्पेशल' स्टिकर पॅक युजर्सना खूप आनंद देणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. युजर्सना कंपनीने खास व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगचे फीचर दिलं आहे.

WhatsApp ने अँड्राईड आणि iOS युजर्ससाठी आपल्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्रुप कॉलची मर्यादा वाढविण्यात आली आहे.

नवीन बीटा व्हर्जनमध्ये ग्रुप व्हिडिओ किंवा व्हाईस कॉलिंगसाठी आठ जण एकत्र येतील, असा सपोर्ट देण्यात आला आहे. याआधी फक्त चार जण एकत्र येऊन व्हिडिओ कॉल करण्याची मर्यादा होती.

WhatsApp फीचर ट्रॅकर WABetaInfo ने म्हटले आहे की, युजर्सला आठ जणांशी व्हिडिओ कॉल करण्यासाठी लेटेस्ट बीटा व्हर्जन अपडेट करावे लागेल. जर आधीच WhatsApp अपडेट केले असेल नाही, हे फीचर नसेल तर पुन्हा इन्स्टॉल करू शकता.