Top 5 Smartphones: 'हे' आहेत या वर्षीचे 5 सर्वाधिक पॉप्युलर Smartphone, तुमच्याकडे आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 04:48 PM2022-12-12T16:48:09+5:302022-12-12T16:52:17+5:30

Top 5 Smartphones Under 35000: तुम्ही कमी किमतीत एका प्रीमियम फोनच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Top 5 Smartphones Under 35000: भारतात 35 हजार रुपयांच्या आत येणारे स्मार्टफोन्स खूप पॉप्युलर आहेत. या प्राइज रेंजमध्ये टॉप फीचर्ससह अपर-मिड रेंज डिव्हाइस मिळतात. या लिस्टमध्ये अनेक असे स्मार्टफोन्स आहेत, जे दिसायला अतिशय स्टायलिश दिसतात. याशिवाय, या फोनमध्ये फ्लॅगशिप कॅमेरा सेंसर्सदेखील मिळतात. 35 हजार रुपयांच्या प्राइज रेंजमध्ये Nothing Phone 1, Pixel 6a, OnePlus Nord 2T सह अनेक स्मार्टफोन्स आहेत. जाणून घेऊ 5 स्मार्टफोन्सबद्दल, जे सध्या चर्चेत आहेत...

Nothing Phone 1- या वर्षीच्या मोस्ट स्टायलिश फोनबद्दल बोलायचे झाल्यास Nothing Phone 1 टॉपवर आहे. हा फोन फक्त दिसायलाच नाही, तर सॉफ्टवेयर आणि हार्डवेअरच्या बाबतीमध्येही बेस्ट आहे. फोनमधये 8GB RAM + 128GB स्टोरेज असून, याची किंमत 32,999 रुपये आहे. फोनमध्ये Snapdragon 778G चिपसेट मिळतो.

Google Pixel 6a- Pixel 6 च्या तुलनेत Google Pixel 6a स्वस्त स्मार्टफोन आहे. फोनमध्ये 60hz चा डिस्प्ले मिळतो. तसेच, फोनमध्ये फ्लॅगशिप लेव्हलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये 6.1-इंच FHD+ डिस्प्ले असून, यात 4410mAh ची दमदार बॅटरी आहे. हा फोन 6 GB RAM+ 128 GB स्टोरेजसह येतो आणि याची किंमत 29,999 रुपये आहे.

Xiaomi 11T Pro 5G Hyperphone- Xiaomi चा Xiaomi 11T Pro 5G Hyperphone सध्या चर्चेत आहे. या फोनमध्ये 120W हायपरचार्ज टेक्नोलॉजी आहे, जी 5000mAh बॅटरीला फक्त 17 मिनिटात फुल चार्ज करते. फोनमध्ये 6.7-इंच डिस्प्ले, 108MP चा कॅमेरा असून, 8 GB RAM+128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 33,990 रुपये आहे.

iQOO Neo 6- iQOO Neo 6 देखील सध्या खूप चर्चेतला फोन आहे. या फोनची खूप चांगली विक्री झाली आङे. फोनमध्ये 6.2-इंच डिस्प्ले, 64MP चा दमदार कॅमेरा आणि 4700mAh ची तगडी बॅटरी मिळते. 8 GB RAM+128 GB स्टोरेज फोनची किंमत 28,999 रुपये आहे.

OnePlus Nord 2T- OnePlus Nord 2T भारतात खूप पॉप्युलर आहे. Nord 2 हिट झाल्यानंतर Nord 2T देखील सुपरहिट ठरला आहे. फोनमध्ये 6.7-इंच डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. यात 4,500mAh बॅटरी मिळते. 8GB RAM + 128GB स्टोरेज फोनची किंमत 28,999 रुपये आहे.