Mother's Day Gift: आईला द्या हायटेक गिफ्ट्स; पहा तुमचा बजेटमध्ये बसणाऱ्या शानदार गॅजेट्सची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 04:53 PM2022-05-07T16:53:21+5:302022-05-07T17:11:06+5:30

यंदा मदर्स डेच्या निम्मितानं तुम्ही तुमच्या आईला गॅजेट गिफ्ट देऊ शकता. ज्याचा उपयोग करता येईल आणि खिशावर जास्त भार देखील पडणार नाही.

यंदा मदर्स डेच्या निम्मितानं तुम्ही तुमच्या आईला गॅजेट गिफ्ट देऊ शकता. ज्याचा उपयोग करता येईल आणि खिशावर जास्त भार देखील पडणार नाही.

स्मार्ट टीव्ही स्टिकवर फक्त अ‍ॅमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्सवरून वेब सीरिज बघता येत नाहीत, तर तुमच्या आईच्या आवडीच्या मालिका देखील बघता येतील. अ‍ॅलेक्सा वॉयस रिमोटसह Fire TV Stick 4K तुम्ही 3,499 रुपयांमध्ये मिळवू शकता, तर शाओमी टीव्ही स्टिक आणि रियलमी स्मार्ट टीव्ही स्टिकची किंमत 2,799 रुपये आहे. यांचा वापर करून तुम्ही तुमची जुनी टीव्ही स्मार्ट बनवू शकता.

OnePlus Nord Buds तुम्ही 2,799 रुपयांमध्ये घेऊ शकता. तसेच Realme Buds Air 2 ची किंमत 3,299 रुपये आहे. जर तुमची आई म्युजिक ऐकत असेल किंवा मोबाईलवर आवडीचे चित्रपट एन्जॉय करत असेल तर हे परफेक्ट गिफ्ट ठरू शकतात.

सध्या बाजारात अनेक स्मार्टवॉच आहेत जे 3500 रुपयांच्या आत येतात. हे वॉचेस स्लिप मॉनिटर, हार्ट रेट सेन्सर, ब्लड ऑक्सिजन लेव्हल इत्यादी गोष्टींवर लक्ष ठेवतात. Amazfit Bip U स्मार्टवॉच अ‍ॅमेझॉनवर 2,999 रुपयांमध्ये तर Dizo Watch S स्मार्टवॉच 2299 रुपयांमध्ये मिळेल.

स्मार्ट स्पिकर फक्त म्युजिक ऐकण्याच्या कामी येत नाहीत, तर कनेक्टड स्मार्ट डिव्हाइसेस तुमची आई फक्त आवाजाने बंद किंवा चालू करू शकते. Amazon Echo Dot स्मार्ट स्पिकर सध्या 2,949 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तर Google Nest Mini ची किंमत 2,499 रुपये आहे.

एकदा बेडवर पडल्यानंतर लाईट बंद करण्यासाठी उठणं कोणालाच आवडत नाही. अशावेळी बेडसाइड स्मार्ट लॅम्प तुम्ही अ‍ॅप्स आणि वॉयस कमांडच्या माध्यमातून कंट्रोल करू शकता. Mi Smart Bedside Lamp 2 आणि Mi Smart LED Desk Lamp 1S ची किंमत 2,799 रुपये आहे.