तुमचं आधारकार्ड दुसरंच कोणीतरी वापरतंय? 'अशी' करा सुरक्षिततेची खात्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 11:04 PM2021-03-17T23:04:05+5:302021-03-17T23:14:08+5:30

आधारकार्डचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. मात्र, तुमच्या आधारकार्डाचा गैरवापर तर होत नाही ना, याची खात्री करता येऊ शकते. कसे? जाणून घ्या... know how to check if your aadhar card was misused

आधारकार्ड (Aadhaar Card) आताच्या घडीला बंधनकारक झालं आहे. मोबाइलसाठी सीमकार्ड घ्यायचं असो किंवा बँकेतील एखादे काम असो, आधारकार्डाशिवाय कोणतेच काम पुढे जाऊ शकत नाही. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कोणत्याही कंपनीत वा संस्थेत आधारकार्डाशिवाय पान हलत नाही.

ओळखपत्र म्हणून आधारकार्डाचे महत्त्व नजीकच्या काळात अधिक वाढणार असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत आपले आधारकार्ड सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करून घेणे उपयुक्त मानले जाते.

डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढल्यापासून गुन्हेगारीचे स्वरुपही वाढायला लागले आहे. आधारकार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज असल्यामुळे त्याचा दुसऱ्याकडून तर वापर केला जात नाही ना, याची पडताळणी करणे आवश्यक झाले आहे.

मागील सहा महिन्यापर्यंत आधारकार्डाचा गेल्या वापर कसा आणि कुठे करण्यात आला आहे, याची माहिती आता घेता येऊ शकते. आपल्या आधारकार्ड तपशील इतर कुणाला मिळाला तर नाही ना, याचा गैरवापर झाला नाही ना, याची खात्री करण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत. जाणून घेऊया... (how to check if your aadhar card was misused)

UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन हे तुम्ही चेक करू शकता. आधार कार्डचा वापर झाला आहे की नाही. कधी-कधी याचा वापर झाला आहे. यासासाठी तुम्ही सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे.

https://resident.uidai.gov.in/notification-aadhaar लिंक ओपन करावी. समोर दिसत असलेल्या बॉक्स मध्ये १२ अंकी आधार नंबर भरावा. यानंतर ४ अंकी सिक्योरिटी कोड भरावा. आता ओटीपी जनरेटवर क्लिक करावे.

नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. तो तेथे सादर करावा. पुन्हा स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन करावे. यामध्ये तुम्हाला ऑथेंटिकेशन टाइप, सिलेक्ट डेट रेंज, नंबर ऑफ रिकॉर्ड असे पर्याय दिसतील.

नवीन ओपन झालेल्या पेजवर जाऊन ड्रॉप डाऊन मेन्यूमध्ये ऑल पर्याय दिसेल त्याला क्लिक करा. यानंतर 'ऑथेंटिकेशन टाइप' ड्राप डाउन मध्ये 'ऑल' चा पर्याय निवडावा.

तुम्हाला पेजवर 'सिलेक्ट डेट रेंज' निवडावा लागेल. या ठिकाणी जास्तीत जास्त महिने जुनी माहिती मिळू शकते. यानंतर तुम्हाला सबमिट पर्याय निवडावा लागेल.

तुम्हाला नंबर ऑफ रेकॉर्ड्स समोर दिसू शकतील. या पेजवर आवश्यक ती माहिती भरावी. मात्र, या ठिकाणी जास्तीत जास्त ५० रेकॉर्ड्सची माहिती प्राप्त करता येऊ शकते.

यानंतर या ठिकाणी ऑथेंटिकेशनसाठी ओटीपी सादर करा आणि सबमिटरवर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल. यानंतर तुमचं आधारकार्ड कधी आणि किती वेळा वापरले गेले आहे, याची माहिती तुम्ही प्राप्त करू शकता. तसेच तुमच्या आधारकार्डचा चुकीचा वापर केला आहे, याची तक्रारही तुम्हाला करता येऊ शकते.

दरम्यान, आता आपण जवळच्या पोस्ट ऑफिसवर आधार कार्डची नोंदणी किंवा अपडेशन करू शकता, यासाठी या सुविधेची संपूर्ण यादी प्रत्येक राज्यात उपलब्ध आहे असून, आधारच्या डेमोग्राफीचा तपशील म्हणजेच नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अद्ययावत ही सर्व कामं पोस्ट ऑफिसमध्ये केली जाणार आहेत.