स्मार्टफोन हरवलाय? अशा पद्धतीने ट्रॅक करा लोकेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 02:37 PM2019-05-02T14:37:33+5:302019-05-02T14:45:33+5:30

स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र कधी कधी फोन हरवतो किंवा चोरीला जातो. अशा वेळी महत्त्वाचा डेटा हा फोनमध्ये सेव्ह असल्याने फोन शोधणं गरजेचं असतं. तसेच चोरीला गेलेल्या फोनमधील माहिती लीक होण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळे हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन शोधायचा कसा हे जाणून घेऊया.

हरवलेला फोन शोधण्यासाठी स्मार्टफोन ऑन असणं गरजेचं आहे. तसेच फोनमध्ये गुगल अकाऊंट म्हणजेच जीमेल लॉग इन असणं गरजेचं आहे. तुमचा स्मार्टफोन हा मोबाईल डेटा किंवा वाय-फाय कोणत्यातरी इंटरनेट माध्यमाशी जोडलेले असणे महत्त्वाचे आहे.

स्मार्टफोनमध्ये GPS ऑन असलं पाहिजे तरच फोनचं लोकेशन समजू शकणार आहे. तसेच फोनमध्ये फाइंड माय डिव्हाईस चालू असणं गरजेचं आहे.

सर्वप्रथम आपल्या संगणकावरून https://www.google.com/android/find या लिंकवर जा.

वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्या ई-मेल आयडीने लॉग इन करा. स्मार्टफोनमध्ये रजिस्टर असलेला किंवा कनेक्ट असलेला ई-मेल आयडी असणे गरजेचं आहे.

लॉग इन केल्यानंतर गुगल मॅपवर तुमच्या फोनचे लोकेशन दाखवण्यात येईल.

लोकेशनसोबतच इतरही काही पर्याय दिसतील. साउंड प्ले पर्यायावर क्लिक केल्यास तुमचा फोन सायलेंट असेल तरी त्याची रिंग वाजेल.

लॉक या पर्यायावर क्लिक केल्यास डिस्प्ले मेसेज किंवा फोन नंबर लॉक करता येऊ शकतो.

तिसऱ्या पर्यायावर क्लिक करून तुमच्या स्मार्टफोनमधील डेटा डिलीट करता येतो.

या पद्धतीमुळे जर तुम्ही हरवलेला फोन शोधू शकला नाहीत तरी तुमची महत्त्वाची वैयक्तिक माहिती लीक होण्यापासून वाचवू शकता.