आता स्मार्टफोनमध्ये Sim Cardची आवश्कता नाही! भारतीय ग्राहकांना 'या' खास पद्धतीनं चालवता येईल स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 04:23 PM2022-10-01T16:23:21+5:302022-10-01T16:32:21+5:30

जर आपल्याला ही केवळ एक कल्पना वाटत असेल, तर तसे नाही. कारण अनेक कंपन्या सिम स्लॉट शिवाय आपले स्मार्टफोन ऑफर करत आहेत.

भारतात वापरल्या जाणार्‍या अधिकांश स्मार्टफोन्समध्ये, आपल्याला फिजिकल सिम टाकावे लागते. या सिम कार्ड्ससाठी प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये सिम स्लॉट बनविलेला असतो. काही स्मार्टफोनमध्ये दोन सिमकार्ड टाकता येतात. तर काहींमध्ये केवळ एकाच सीमची व्यवस्था असते.

आपल्याला माहीत आहे का, की येणाऱ्या काळात आपल्याला कदाचित स्मार्टफोनमध्ये फिजिकल सिम कार्ड टाकायची गरजच पडणार नाही. जर आपल्याला ही केवळ एक कल्पना वाटत असेल, तर तसे नाही. कारण अनेक कंपन्या सिम स्लॉट शिवाय आपले स्मार्टफोन ऑफर करत आहेत.

सिम कार्ड शिवाय कसा चालेल स्मार्टफोन? - जर आपण विचार करत असाल, की स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड टाकावे लागणार नाही, तर तसे नाही. कारण, आम्ही आपल्याला भविष्यात फिजिकल सिम कार्ड टाकण्याची आवश्यकता संपू शकते, असे सांगत आहोत. असे एका खास तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे.

या तंत्रज्ञानाचे नाव आहे, ई-सिम. आता सध्या आयफोनमध्ये ही सुविधा दिसून येत आहे आणि आता गूगल आपल्या पिक्सल 7 सीरीज स्मार्टफोंसमध्ये ई-सिम फीचर ऑफर करू शकतो. यानंतर, आपल्याला स्मार्ट फोनमध्ये सिम कार्ड टाकण्याची आश्यकताच भासणार नाही आणि सिम स्लॉट उघडण्याची गरजही पडणार नाही.

युजर्सना ई-सिम कसे मिळते? - ई-सिम मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. यासाठी केवळ काही मिनिटांचा वेळ लागतो. मंजुरी मिळताच हे सिम आपल्या स्मार्टफोनवर सक्रीय होते. महत्वाचे म्हणजे यासाठी आपण आपल्या पसंतीच्या टेलिकॉम कंपनीचे ई-सिम निवडू शकतो. यासाठी कोणतेही वेगळे शुल्क देण्याची आश्यकता नाही. आपल्याला केवळ कंपनीचा एक रिचार्ज प्लॅन सक्रिय करावा लागेल आणि बाकीचे काम फिजिकल सिम सारखेच असेल.

यामुळे फोनमधील सिम स्लॉट हटल्याने स्पेस वाढेल. यामुळे बॅटरीच्या क्षमतेसह आणखीही काही फीचर्स स्मार्टफोन कंपन्यांकडून ऑफर केले जाऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, ही सुविधा भारतातील प्रत्येक स्मार्टफोनमध्ये केव्हापर्यंत बघायला मिळेल, यासाठी आणखी काही वर्षांचा अवधी लागेल.