Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp ओपन न करता कोण, कधी ऑनलाईन आहे हे असं जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:22 PM2020-04-27T14:22:51+5:302020-04-27T16:42:52+5:30

Coronavirus : व्हॉट्सअ‍ॅपवर ट्रिक्सच्या माध्यमातून एखादी व्यक्ती कधी ऑनलाईन येते याबाबत माहिती मिळते. पण अनेकांना हे माहीत नाही. कसं पाहायचं हे जाणून घेऊया. 

कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान घरबसल्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. 

लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जात असून व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अगदी सहज एकमेकांशी कनेक्ट होता येतं. 

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा एखाद्या व्यक्तीला मेसेज केल्यावर ती व्यक्ती प्रत्येकवेळी ऑनलाईन असेलच असे नाही. तर कधी आपण ऑनलाईन नसतो. 

व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करता अनेकदा कोण आणि कधी ऑनलाईन आहे हे पाहण्याची उत्सुकता अनेकांना असते. अशाच युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर हे पाहण्याची देखील सुविधा देण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर ट्रिक्सच्या माध्यमातून एखादी व्यक्ती कधी ऑनलाईन येते याबाबत माहिती मिळते. पण अनेकांना हे माहीत नाही. कसं पाहायचं हे जाणून घेऊया. 

आपल्याला हवा असलेला कॉन्टॅक्ट नंबर जेव्हा ऑनलाईन येईल तेव्हा एक नोटिफिकेशन पाठवलं जाईल.

व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करता कोण ऑनलाईन हवं ते पाहण्यासाठी सर्वप्रथम GBWhatsApp हे अ‍ॅप डाऊनलोड करा.

साधारण व्हॉट्सअ‍ॅपपेक्षा हे अ‍ॅप जास्त अ‍ॅडव्हान्सवालं फीचर अ‍ॅप आहे.

हे अ‍ॅप  डाऊनलोड करण्यासाठी गुगलवर GB Whatsapp APK असं सर्च करा. 

GBWhatsApp अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर सेटिंगमध्ये जा.

सेटिंगमध्ये देण्यात आलेल्या Main/Chat screen या पर्यायावर क्लिक करा.

Contact Online Toast हा पर्याय निवडा.

त्यानंतर Show contact online toast हे क्लिक करा.

तुम्ही निवडलेला कॉन्टॅक्ट नंबर जेव्हा ऑनलाईन येईल तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवलं जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

घरात बसून राहावे लागत असल्याने अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी WhatsApp वर कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे.

WhatsApp चॅटिंगची गंमत आता आणखी वाढणार आहे. युजर्सना 'लॉकडाऊन स्पेशल' स्टिकर्स पाठवता येणार असून यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने खास स्टिकर पॅक आणला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने ‘Together at Home'  चे स्टिकर पॅक लाँच केलं आहे. यासाठी कंपनीने जागतिक आरोग्य संघटनेसोबत हात मिळवणी केली आहे.