'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 09:41 AM2024-05-17T09:41:44+5:302024-05-17T09:42:28+5:30

'चौधवी शब को कहा' हे रोमँटिक गाणं आणि त्यावर गौतमीचं नृत्य

Gautami Patil also performed on the romantic song of Heeramandi fans got mesmerized after seeing video | 'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ

'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ

सध्या नेटफ्लिक्सवर गाजत असलेली वेबसीरिज म्हणजे 'हीरामंडी:द डायमंड बाजार'.(Heeramandi) सीरिजमधील डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांना वेड लावत आहेत. सर्वच हीरामंडीमय झालेत. या सीरिजमधलं एक गाणं खूपच लोकप्रिय ठरतंय. श्रेया घोषालच्या आवाजातलं 'चौधवी शब को कहा' गाण्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलंय. याच गाण्यावर अनेक रील्सही व्हायरल होत आहेत. दरम्यान गौतमी पाटीलनेही (Gautami Patil) या गाण्यावर आपली अदा दाखवत चाहत्यांना प्रेमात पाडलंय.

गौतमी पाटील उत्तम नृत्यांगना आहे. गावोगावी तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी असते. नुकतंच तिने 'हीरामंडी' च्या 'चौधवी शब' या लोकप्रिय गाण्यावर व्हिडिओ बनवला. डिझायनर साडी, हातात मॅचिंग बांगड्या, नथ, मोत्याचे झुमके, लांब वेणी त्यावर गजरा, ग्लॅमरस मेकअप या लूकमध्ये तिने गाण्यावर ठेका धरला. तिची एक नजर चाहत्यांना घायाळ करणारी आहे.'हीरामंडी'चाच फील देतील अशा तिच्या अदा आहेत. गौतमीचा व्हिडिओ सध्या चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल होतोय. 

'एवढी कशी गोड तू','नृत्याच्या आणि सुंदरतेच्या बाबतीत कोणी तुझा हात धरु शकत नाही' अशा कमेंट्स गौतमीला आल्या आहेत. गौतमीची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. ती लवकरच सिनेमांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय तिचा 'घुंगरु' हा सिनेमा काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता.

'हीरामंडी'सीरिजमधील आलम आणि ताज या व्यक्तिरेखांवर हे रोमँटिक गाणं चित्रित झालं आहे. आलम आणि ताज यांची प्रेमकहाणी दर्शवणारं हे या सीझनमधलं सर्वात रोमँटिक गाणं आहे. प्रेक्षक त्यांच्या प्रेमकहाणीचे चाहते झालेत. 1 मे रोजी संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी' सीरिज रिलीज झाली. सध्या सीरिजला भरपूर प्रतिसाद मिळतोय.

Web Title: Gautami Patil also performed on the romantic song of Heeramandi fans got mesmerized after seeing video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.