Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत सध्या मोठी उलथापालथ झाली आहे. गौतम अदानी (Gautam Adani) आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. पाहा किती वाढली अदानींची संपत्ती, कोण कितव्या क्रमांकावर.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 01:45 PM2024-06-01T13:45:45+5:302024-06-01T13:46:11+5:30

Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत सध्या मोठी उलथापालथ झाली आहे. गौतम अदानी (Gautam Adani) आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. पाहा किती वाढली अदानींची संपत्ती, कोण कितव्या क्रमांकावर.

adani group Gautam Adani surpasses reliance Mukesh Ambani to become the richest person in Asia | Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत सध्या मोठी उलथापालथ झाली आहे. गौतम अदानी (Gautam Adani) आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकलं आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index) अदानी यांच्या संपत्तीत शुक्रवारी ५.४५ अब्ज डॉलरची वाढ झाली. 

यासह अदानी संपत्ती १११ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत ते ११ व्या आणि आशियात पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. तर मुकेश अंबानी १०९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत १२ व्या तर आशियात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शुक्रवारी अदानी सर्वाधिक कमाई करणारे अब्जाधीश ठरले. या वर्षी त्यांच्या संपत्तीत २६.८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका अहवालामुळे गेल्या वर्षी जानेवारीत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. पण त्यांनी ती बऱ्याच अंशी भरून काढली आहे.
 

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअरमध्ये लक्षणीय वाढ झाली. ट्रेडिंग दरम्यान ते १४ टक्क्यांपर्यंत वधारले. समूहाची होल्डिंग कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर सात टक्क्यांनी वधारून ३,४१६.७५ रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्ट्सचा शेअरही ४ टक्क्यांनी वधारून १,४४० रुपयांवर बंद झाला. कामकाजाच्या अखेरिस अदानी पॉवर ९ टक्क्यांनी वधारून ७५९.८० रुपयांवर बंद झाला. त्याचप्रमाणे अदानी टोटल गॅसचा शेअर ९ टक्क्यांनी वधारून १,०४४.५० रुपयांवर पोहोचला. अदानी विल्मर ३ टक्के, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स २ टक्क्यांनी वधारले. एनडीटीव्हीचे शेअर्स आठ टक्के, अंबुजा सिमेंट आणि एसीसीचे शेअर्स दोन टक्क्यांनी वधारले.
 

कोण आहेत टॉप १० मध्ये?
 

अमेरिकेतील मायकेल डेल यांच्या संपत्तीत शुक्रवारी सर्वात मोठी घसरण दिसून आली. डेल यांना ११.७ अब्ज डॉलरचे नुकसान झालं असून ते श्रीमंतांच्या यादीत ११ व्या स्थानावरून १३ व्या स्थानावर घसरले. जगातील दहा आघाडीच्या अब्जाधीशांपैकी आठ अब्जाधीशांच्या संपत्तीत शुक्रवारी वाढ झाली. या यादीत फ्रान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट २०७ अब्ज डॉलरसह पहिल्या क्रमांकावर आहेत. एलन मस्क (२०३ अब्ज डॉलर) दुसऱ्या आणि जेफ बेजोस (१९९ अब्ज डॉलर) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (१६६ अब्ज डॉलर) चौथ्या, लॅरी पेज (१५३ अब्ज डॉलर), बिल गेट्स (१५२ अब्ज डॉलर) सहाव्या, सर्गेई ब्रिन (१४५ अब्ज डॉलर) सातव्या, स्टीव्ह बाल्मर (१४४ अब्ज डॉलर) आठव्या, वॉरेन बफे (१३७ अब्ज डॉलर) नवव्या आणि लॅरी एलिसन (१३२ अब्ज डॉलर) दहाव्या क्रमांकावर आहेत.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: adani group Gautam Adani surpasses reliance Mukesh Ambani to become the richest person in Asia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.