Lokmat Money >शेअर बाजार > Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला

Opening Bell: चालू आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 72 अंकांनी घसरून 73591 अंकांवर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 09:48 AM2024-05-17T09:48:15+5:302024-05-17T09:48:30+5:30

Opening Bell: चालू आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 72 अंकांनी घसरून 73591 अंकांवर उघडला.

Opening Bell Sensex Nifty opens with decline Mahindra gains Adani Ports falls | Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला

Opening Bell: चालू आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 72 अंकांनी घसरून 73591 अंकांवर तर निफ्टी 28 अंकांनी घसरून 22376 अंकांवर उघडला. त्यानंतर त्यात आणखी घसरण दिसून आली. 
 

शेअर बाजारातील कामकाजात महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, बीपीसीएल, ओएनजीसी, बजाज ऑटो, टाटा स्टील आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर अॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, एशियन पेंट्स, ब्रिटानिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स सुरुवातीच्या कामकाजादरम्यान घसरले.
 

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती
 

निफ्टीच्या क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल बोलायचं झालं तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँकेसह निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकातही घसरण दिसून आली. निफ्टी मिडकॅप १००, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा निर्देशांकात तेजी होती. शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या समभागांबाबत सांगायचं झालं तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, इरकॉन इंटरनॅशनल, इंजिनीअर्स इंडिया आणि ओएनजीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती, तर एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, लार्सन, विप्रो, एचसीएल टेक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
 

प्री-ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स 48 अंकांच्या वाढीसह 73711 अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 12 अंकांच्या वाढीसह 22415 अंकांवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराचे कामकाज सुरळीत सुरू होऊ शकते, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते.

Web Title: Opening Bell Sensex Nifty opens with decline Mahindra gains Adani Ports falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.