रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 06:56 PM2024-05-16T18:56:44+5:302024-05-16T18:58:09+5:30

Lok Sabha Elections 2024: दोन दिवसांच्या दौऱ्यावर सोनिया गांधी रायबरेलीला पोहोचल्या आहेत.

sonia gandhi active in rae bareli even before akhilesh yadav rahul gandhi priyanka arrived for rally Lok Sabha Elections 2024 | रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!

file photo

Sonia Gandhi in Rae Bareli: सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. काँग्रेसच्या गांधी-नेहरू घराण्याची परंपरागत जागा मानल्या जाणाऱ्या रायबरेलीमध्ये पुन्हा एकदा गांधी कुटुंब एकत्र येणार आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी शुक्रवारी रायबरेलीमध्ये एका विशाल जनसभेला संबोधित करणार आहेत. 

या जाहीर सभेला समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादवही उपस्थित राहणार आहेत. मात्र, या मतदारसंघातून दोन दशके खासदार राहिलेल्या सोनिया गांधी या जाहीर सभेपूर्वीच रायबरेलीत सक्रिय झाल्या आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यावर त्या रायबरेलीला पोहोचल्या आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज सोनिया गांधी भुएमऊ येथे कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. यानंतर उद्या म्हणजेच शुक्रवारी त्या एका मोठ्या जाहीर सभेत सहभागी होणार आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता आयटीआय मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे.

रायबरेली लोकसभा मतदारसंघ हा गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला आहे. या जागेवरून निवडणूक जिंकून गांधी कुटुंबीयांतील अनेक सदस्य संसदेत पोहोचले आहेत. २००४ ते २०२४ या काळात सोनिया गांधी यांनी रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला रायबरेलीची जागा मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत नाहीत.

दरम्यान, रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसने राहुल गांधींना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे. रायबरेलीमध्ये पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात सपा आणि काँग्रेसमध्ये आघाडी आहे. हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत. त्यामुळे या जागेवर काँग्रेस आणि सपाचे कार्यकर्ते एकजुटीने निवडणूक प्रचारात गुंतले आहेत.

Web Title: sonia gandhi active in rae bareli even before akhilesh yadav rahul gandhi priyanka arrived for rally Lok Sabha Elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.