बापरे! सायबर फ्रॉडची नवी पद्धत, 'हे' 5 SMS अडकवताहेत जाळ्यात; एक क्लिक अन् अकाऊंट रिकामं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 03:28 PM2022-12-01T15:28:45+5:302022-12-01T15:36:29+5:30

Cyber Fraud : स्कॅमर्स फ्रॉड करण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धतींचा वापर करत आहेत. त्यांनी नवनवीन पद्धती शोधून काढल्या आहेत.

सायबर फ्रॉडच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. हॅकर्स वेगवेगळ्या पद्धतीने युजर्सना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. यामध्ये बँक अकाऊट रिकामं होण्याचा सर्वाधिक धोका आहे. अशा वेळी या फ्रॉडपासून सावध राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

स्कॅमर्स फ्रॉड करण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धतींचा वापर करत आहेत. त्यांनी नवनवीन पद्धती शोधून काढल्या आहेत. कधी वीज कापली जाईल असं सांगितलं जातं. तर कधी नव्या जॉबचं आमिष दाखवण्यात येतं. लोकांना अनेक मेसेज केले जातात. यामध्ये एक लिंकही असते. यावर क्लिक केल्यावर आपले डिटेल्स हे त्यांना मिळतात.

युजर्सना तुमचं जॉब एप्लिकेशन अप्रूव केलं गेल्याचं सांगितलं जातं. यानंतर पगाराचा मोठा आकडा सांगतात. शेवटी एक लिंक देऊन त्यावर क्लिक करा असं म्हणतात. ही Whatsapp ची लिंक असते. यामध्ये आपलं चॅट हे स्कॅमरसोबत ओपन होतं. त्यानंतर पर्सनल डिटेल्स मागून फसवणूक केली जाते.

स्कॅमर्स युजर्सना त्यांचं बँक अकाऊंट ब्लॉक झाल्याची माहिती देतात. यात कधी SBI Yono चा उल्लेख असतो. तर कधी HDFC नेटबँकिंग ब्लॉक केल्याचं सांगितलं जातं. बँकेशी संबंधित असल्याने युजर्स जास्त घाबरतात. पण अशा फिशिंग लिंकवर क्लिक करण्याची चूक अजिबात करू नका.

वीज कापली जाईल हा मेसेज म्हणजे कॉमन स्कॅम आहे. यामध्ये युजर्सना तुमच्या घराची वीज कापली जाणार असं सांगितलं जात. तसेच यापासून वाचायचं असेल तर एका नंबरवर कॉल करा असं सांगतात. हा नंबर स्कॅमरचा असतो. यातून स्कॅमर आपली सर्व माहिती काढून घेतो.

लोन देण्याच्या नावाने युजर्सना फसवलं जात. तुमचं लोन प्री अप्रूव्ड झालं आहे असा मेसेज केला जातो. तसेच लोन मिळेल असंही काही वेळा सांगितलं जातं. एक लिंक देऊन त्यावर क्लिक करा असं सांगितलं जातं. यातून मोठी फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

हा स्कॅमचा नवा प्रकार आहे. यामध्ये युजर्सना एक मेसेज पाठवण्यात आला येतो. ज्यामध्ये त्यांना तुमचं एक महागडं गिफ्ट कस्टम विभागाकडे जमा आहे असं सांगितलं जातं. हे मिळवण्यासाठी कस्टम ड्यूटी पे करण्यास सांगितलं जातं. कस्टम ड्यूटीच्या माध्यमातून हा फ्रॉड होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.