Youtuber Armaan Malik : युट्युबर अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी प्रेग्नंट; ही विचित्र फॅमिली सोशल मीडियावर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 11:01 AM2022-12-11T11:01:35+5:302022-12-11T11:10:32+5:30

हैदराबादचा प्रसिद्ध युट्युबर अरमान मलिक भलत्याच कारणाने चर्चेत आहे. अरमानला दोन पत्नी आहेत आणि दोघीही एकाच वेळी प्रेग्नंटही झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोघीही एकाच घरात राहतात. नेटकरी अशा विचित्र कुटुंबाला चांगलेच ट्रोल करत आहेत.

कंटेट क्रिएटर, युट्युबर अरमान मलिकने इन्स्टाग्रामवरआपल्या दोन्ही पत्नींसोबत फोटो पोस्ट केला आहे. पायल मलिक आणि कृतिका मलिक अशी दोघांची नावे आहेत.

सोबतच त्याने गुडन्युज देत 'माय फॅमिली' असे कॅप्शन दिले आहे. अरमानच्या या पोस्टवर टीकाच जास्त होत आहे.

अरमानचे इन्स्टाग्रामवर १५ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत असतात.

अरमानने २०११ मध्ये पायल सोबत लग्न केले होते. दोघांना चिरायु या मुलाला जन्मही दिला.

त्यानंतर २०१८ मध्ये अरमानने कृतिकासोबत लग्न केले. विशेष म्हणजे कृतिका पायलची चांगली मैत्रिण होती. तेव्हापासून हे कुटुंब एकत्र राहू लागले.

यावर इंटरनेट युझर्स चांगलेच भडकले आहेत. दोन लग्न करण्याची परवानगी आहे का असा प्रश्न एकाने उपस्थित केलाय.

अनेक फोटो मध्ये पायल आणि कृतिका एकत्र दिसत आहेत.

तर दोघी एकाच वेळी कशा प्रेग्नंट झाल्या म्हणून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर भाई तु क्रिकेटची एक टीमच बनवशील असे म्हणत ट्रोल केले आहे.