शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 4:24 PM

1 / 7
नोकरीवरून काढून टाकणं कोणासाठीही अपमानकारक ठरू शकतं. असा प्रसंग घडल्यानंतर काही लोक स्वतःला दोष देत शांत राहतात. तर काहीजण आपला अपमान सहन करू शकत नाहीत म्हणून सुडबुद्धीनं वागण्याचा प्रयत्न करतात. अमेरिकेत अशीच घटना समोर आली आहे.
2 / 7
वॉलमार्टमधून एका व्यक्तीला कामावरून काढून टाकण्यात आलं. म्हणून त्यानं रागात स्टोरच्या गेटला तोडण्याचा प्रयत्न केला आणि हे सुपरमार्केट उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
3 / 7
ही घटना अमेरिकेतील उत्तर कैरोलिनाच्या कॉर्नकॉर्डमधील थंडर रोडवरील वॉलमार्ट स्टोरची आहे. ३२ वर्षीय आरोपीनं आपली कार गेटमध्ये घुसवत सुपरमार्केटचं नुकसान केलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोतून आरोपीला अटक केली असून सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करणं आणि सुपरमार्केटचं नुकसान करण्याचा आरोप लावण्यात आला आहे.
4 / 7
अमेरिकेच्या fox5ny.com च्या न्यूजच्या रिपोर्टनुसार या आरोपीचे नाव जेंट्री आहे. नोकरीवरून काढलं म्हणून वॉलमार्टबद्दल त्याच्या मनात प्रचंड राग होता.
5 / 7
नोकरीवरून हटवल्यानंतर त्यादिवशी तो आपल्या घरी आला आणि पुढल्या दिवशी सकाळी सुपरमार्केटमध्ये जाऊन हल्ला केला. यावेळी वॉलमार्टचं गेट तोडून त्यानं आत प्रवेश केला आणि सगळ्या वस्तू खाली फेकून दिल्या.
6 / 7
कॉनकॉर्ड पोलिसांनी फेसबुकवर याबाबत माहिती दिली आहे. जेव्हा पोलिस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा आरोपी कार चालवून सुपरमार्केटच्या आत पोहोचला होता.
7 / 7
पोलिसांकडून आरोपीचा फोटो शेअर करण्यात आला असून या माणसाला कोणतीही दुखापत झालेली नाही. पण तोंडावर थकवा जाणवत होता. (Image Credit-
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरल