Winter Food : मुलांना या ७ पदार्थांतून गुपचूप भाज्या खाऊ घाला, कळणारही नाही आणि चवही आवडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2025 14:35 IST2025-11-19T14:29:23+5:302025-11-19T14:35:48+5:30
Winter Food: Secretly feed vegetables to your children from these 7 foods, they won't even know and they will love the taste : लहान मुलांना द्या हे खास पदार्थ. नक्की आवडतील आणि पौष्टिकही असतात.

लहान मुले आवडीने खातील असे पदार्थ त्यांना खायला द्या. थंडीत शरीराला उब देणारे आणि शिवाय चविष्टही असणारे पदार्थ नक्की खायला हवे. पाहा ७ पदार्थ जे पटकन होतात आणि मुलांना आवडतातही.

घरी भाज्या घातलेल्या नुडल्स करता येतात. त्यात विकतच्या चायनिजमध्ये असतात त्यापैकी काही पदार्थ घालायचे नाहीत. फक्त साध्या भाज्या, थोडे सॉस घालायचे. मैदा नसलेल्या नुडल्स मिळतात त्यांचा वापर करायचा. गरमागरम नुडल्स मुलांना नक्की आवडतील.

विविध प्रकारचे सूप करुन मुलांना द्या. थंडीत पोटाला सूप प्यायल्याने आराम मिळतो. तसेच चवीला छान असते शिवाय त्यात भरपूर भाज्या लपवता येतात. करायलाही सूप सोपे असते.

विविध प्रकारचे पराठे करता येतात. थंडीत पालकाचे , मेथीचे छान गरमागरम पराठे करता येतात. ताजी भाजी असते त्यामुळे चवही भारी लागते. त्यात जर तुपावर परतलेले पराठे असतील तर मुले आणखी आवडीने खातात.

पनीर बुर्जी हा एक चमचमीत पदार्थ आहे. नाश्त्यासाठी गरमागरम पनीर बुर्जी आणि सोबत ब्रेड, पराठा नाहीतर चपाती घ्यायची. लहान मुलांना पोषणही मिळेल आणि चवही आवडेल.

मसाला खिचडी करता येते. तसेच गरमागरम डालखिचडी करता येते. त्याला छान लसणाची फोडणी द्यायची. सोबत लोणचं, पापड घ्यायचे. मुले आवडीने खातील. मुलांना पौष्टिक खायची सवय लावा.

सॅण्डविच हा आणखी एक सोपा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. मुलांना आवडतेही आणि त्यात भाज्या लपवता येतात. पनीर, चीज घालून प्रोटीनही वाढवता येते. नक्की करा, डब्यातही देऊ शकता. मुले नक्कीच डबा संपवतील.

तळलेले पदार्थ देण्याऐवजी मुलांना डळींचे, मेथीचे मुटके द्या. हा पदार्थ चवीला मस्त लागतो. कुरकुरीतही करता येतो. जरा परतून कुरकुरीत होतो. तळायलाच हवा असे नाही. त्यामुळे गरम , चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ निवडायचे.

















