गोकुळाष्टमी स्पेशल : दारासमोर आणि देवासमोरही काढा सोपी -सुंदर रांगोळी, पाहा सुंदर डिझाइन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2023 01:36 PM2023-09-07T13:36:12+5:302023-09-07T15:05:11+5:30

Gokul Ashtami Dahihandi Rangoli Designs Photos

गोकुळाष्टमीचा सण म्हणजे राज्यभरात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी आपण घरीही श्रीकृष्णाची पूजा करतो (Gokul Ashtami Dahihandi Rangoli Designs Photos).

यावेळी कन्हैयाला छआन सजवून फुलांनी आणि रांगोळीने आपण सजवतो. ऐनवेळी कोणती कशी रांगोळी काढायची असा प्रश्न पडतो.

एखादी छानशी हंडी आणि बासरी हे गोकुळाष्टमीचे प्रतिक असणाऱ्या गोष्टी रांगोळीत खूप सुंदर दिसतात. यामध्ये आपण हव्या तशी वेगवेगळ्या डीझाईन्स करु शकतो.

हातात कमी वेळ असेल तर नुसते मोरपीस आणि बासरी थोड्या मोठ्या आकाराचे काढले तरी सुंदर दिसते. मात्र याची रंगसंगती छान करावी लागते.

घरात पांढऱ्या टाइल्सवर रांगोळी काढायची असेल तर गडद रंग वापरुन हंडी, बासरी आणि मोरपीस काढू शकतो.

रांगोळीचे आकर्षक रंग वापरुन नवीन पद्धतीने काडीने किंवा बोटाने हंडीची डीझाईन केल्यास ती छान दिसते. यामध्ये पांढऱ्या रांगोळीचा वापर करुन हंडीतून पडणारे दही दाखवू शकतो.

श्रीकृष्ण असे लिहून त्यावर बासरी आणि साधीशी हंडी काढायची. त्यावर फुलांचा वापर करुनही सोपी सुटसुटीत रांगोळी काढता येते.

मोरपीस ही कृष्णाची विशेष ओळख असल्याने या मोरपिसाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बऱ्याच रांगोळ्या आपण काढू शकतो.