युरीक ॲसिड वाढल्याने अंग दुखतंय? ५ योगासनं करा, युरीक ॲसिड राहील कंट्रोलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2026 16:35 IST2026-01-08T16:29:45+5:302026-01-08T16:35:44+5:30

शरीरातलं युरीक ॲसिड जर गरजेपेक्षा जास्त वाढलं तर त्यामुळे अंगदुखी, जॉईंटपेन यासारखे वेगवेगळे त्रास सुरू होतात. युरीक ॲसिड वाढण्यामागे कित्येक वेगवेगळी कारणं असतात.

पण काही व्यायाम करून मात्र ते नियंत्रित ठेवता येतं. त्यासाठी कोणती योगासनं नियमितपणे करायला हवी ते पाहा..

सगळ्यात पहिलं आहे त्रिकोणासन. यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं आणि किडनी तसेच पोटाच्या आसपास असणाऱ्या अवयवांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होऊन त्यांचं कार्य सुधारतं. त्याचा परिणाम म्हणजे शरीरातली युरीक ॲसिडची पातळी कमी होते.

अर्ध्य मत्स्येंद्रासन केल्याने किडनी आणि लिव्हरचं कार्य चांगलं होतं. त्यामुळे बॉडी डिटॉक्ट होत जाते आणि शरीरातलं युरीक ॲसिड नियंत्रित राहण्यास मदत होते.

युरीक ॲसिडची वाढलेली पातळी कमी करण्यासाठी भुजंगासन करणेही खूप फायद्याचे ठरते.

पचनक्रिया सुधारण्यासाठी पवनमुक्तासन करणे खूप फायद्याचे मानले जाते. अन्न पचन व्यवस्थित झाल्यामुळेही शरीरातली वाढलेली युरीक ॲसिडची पातळी कमी होते.

सेतूबंधासन नियमतपणे केल्याने पोटाच्या भागातील अवयवांचे कार्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळेही युरिक ॲसिडचे प्रमाण कमी होते.
















