Raksha Bandhan 2019 : नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 01:29 PM2019-08-13T13:29:12+5:302019-08-13T13:36:47+5:30

राखी पौर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.

भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. बहिण भावाच्या नात्यातील गोडवा कायम ठेवण्यासाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

एखादं नातं टिकवून ठेवण्यासाठी प्रेमासोबतच सन्मानही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा आदर करा. अनेकदा आपण भावंडांची मस्करी करतो मात्र यामुळे ते दुखावले जाण्याची शक्यता असते.

अनेकदा बहिण भाऊ एकमेकांशी पटत नसल्याने बोलत नाहीत. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे सुख, दु:ख शेअर करा. तुमच्या भावना व्यक्त करा म्हणजे नात्यात मोकळेपणा येईल.

एकच गोष्ट सगळ्यांना आवडते असं नाही. कारण प्रत्येकाच्या आवडी-निवडी या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे भावंडांच्या आवडी लक्षात घ्या यामुळे नात्यातील गोडवा अधिक वाढेल.

भावाबहिणींमध्ये काही कारणांवरून नेहमी भांडण होत असतात. मात्र भांडणं झाल्यावर जास्त वेळ राग मनात धरून ठेवू नका. मारामारी करू नका. तर आपापसात बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

भांडण झाल्यावर अनेकदा रागाच्या भरात चुकीचे शब्द बाहेर पडतात. मात्र असं करू नका यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.