शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gram Panchayat Election Results: राज्यातील 'या' बड्या नेत्यांना बसले धक्के; तर 'या' मोठ्या नेत्यांना जनतेनं घेतलं डोक्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 1:34 AM

1 / 16
राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर राजकीय पक्षांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले असले तरी या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील आघाड्यांनीच बाजी मारल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी आमदार-खासदारांपैकी काही लोकप्रतिनिधींना आपापली गावे राखली. मात्र, काही गावांत मतदारांनी नेत्यांना जबरदस्त आणि अनपेक्षित धक्केही दिले आहे.
2 / 16
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव असलेल्या खानापूर (ता. भुदरगड) ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, तिथे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाची सत्ता आली आहे.
3 / 16
अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात १५१ पैकी १२४ ग्रामपंचायतींमध्येे काँग्रेसचे पॅनल विजयी झाले आहे.
4 / 16
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी या गावात ११ पैकी राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत.
5 / 16
सातारा जिल्ह्यातील कोंडवे गावात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पॅनलने खासदार उदयनराजे भोसले यांच्या पॅनलचा पराभव केला.
6 / 16
म्हैसाळ (ता. मिरज) ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला. त्यांचे सख्खे मेहुणे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांची सत्ता उलथवत चुलत मेहुणे भाजपचे दीपक शिंदे यांनी बाजी मारली.
7 / 16
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ७० पैकी ४७ ग्रामपंचायतीवर खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा फडकवला
8 / 16
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा गृहतालुका असलेल्या साकोलीत भाजपने मोठी मुसंडी मारली असून १३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापित केले.
9 / 16
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या तालुक्यातील प्रभावक्षेत्रात अनेक मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली.
10 / 16
लोणी खुर्दमध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पराभव झाला.
11 / 16
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज ग्रामपंचायतीवर माजी मंत्री मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला आहे.
12 / 16
सोलापूर जिल्ह्यात माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना जोरदार धक्का बसला.
13 / 16
अमित देशमुख यांच्या बाभळगावात देशमुख यांच्या पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
14 / 16
कोराडी ग्रामपंचायत राखण्यात भाजपचे महामंत्री, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले.
15 / 16
महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी येथे त्यांच्या नेतृत्वातील पॅनेलने १३ पैकी ७ जागा जिंकल्या.
16 / 16
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल तालुक्यात तीनपैकी एका ग्रा. पं. मध्ये महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटीलUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेraosaheb danveरावसाहेब दानवेAshok Chavanअशोक चव्हाणAnil Deshmukhअनिल देशमुखYashomati Thakurयशोमती ठाकूरBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी