Join us  

१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 

पॅट कमिन्स आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सला सडेतोड उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 10:12 PM

Open in App

IPL 2024, MI vs SRH  Live Marathi  : पॅट कमिन्स आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सला सडेतोड उत्तर दिले. सनरायझर्स हैदराबादच्या या गोलंदाजांनी सलग दोन षटकं निर्धाव टाकली आणि यजमानांवर दडपण निर्माण केले. त्याचा रिझल्ट हा विकेट्स मिळाल्या.. इशान किशन, रोहित शर्मा व नमन धीर हे एकेरी धावसंख्येत माघारी परतले. १.३ षटकांत मुंबईच्या २६ धावा झाल्या होत्या, परंतु पुढील ३ विकेट्स या केवळ ५ धावांत पडल्या. 

MI च्या गोलंदाजांनी दम दाखवला... ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी हार्दिक पांड्याचे फॉर्मात येणे भारतासाठी शुभ संकेत आहेत. त्याने SRH च्या ३ फलंदाजांना माघारी पाठवले. ३५ वर्षीय फिरकीपटू पियूष चावलाने ३ मोठ्या विकेट्स घेऊन सामन्याला कलाटणी दिली. जसप्रीत बुमराहने त्याची इकॉनॉमी कायम राखताना २३ धावांत १ विकेटे घेतली. पदार्पणवीर अंशुल कंबोज थोडा कमनशीबी ठरला, कारण त्याच्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला दोनवेळा जीवदान मिळाले. पण, त्याने ४२ धावांत १ विकेट घेतली. नुवान तुषारा ( ४२) हाही महागडा ठरला. हैदराबादकडून हेडने ३० चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४८ धावा केल्या.  कर्णधार पॅट कमिन्सने १७ चेंडूंत नाबाद ३५ धावा करून संघाला ८ बाद १७३ धावांपर्यंत पोहोचवले. नितिश कुमार रेड्डी ( २०), मार्को यान्सेन ( १७) यांनीही योगदान दिले.

इशान किशन व रोहित शर्मा यांनी MI ला पहिल्याच षटकात १३ धावा कुटून दिल्या. मार्को यान्सेनच्या दुसऱ्या षटकात १३ धावा आल्या होत्या, परंतु त्याने एक अनप्लेअबल चेंडू टाकून इशानला ( ९) स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. भुवनेश्वर कुमारने अप्रतिम इनस्वींगवर नमन धीरला अचंबित केले होते. भुवीने चांगले दडपण निर्माण केले होते आणि त्याचा फायदा पॅट कमिन्सने चौथ्या षटकात उचलला. रोहित शर्मा ( ४) याने मारलेला चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि हेनरिच क्लासेनने सहज झेल टिपला. मुंबईला ३१ धावांवर दोन धक्के बसले आणि यापैकी १८ धावा या अतिरिक्त आहेत. कमिन्सने त्यानंतर पुढच्या तीन चेंडूंवर सूर्यकुमार यादवला चकवले. सूर्याला काहीच समजेनासे झाले. MI चे फलंदाज दडपणात दिसले आणि भुवीने पुढच्या षटकात नमनला भोपळ्यावर ( ९ चेंडू) माघारी पाठवले.  

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादरोहित शर्माभुवनेश्वर कुमार