शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 8:15 AM

Lok Sabha Elections 2024 : गौरीगंजमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Congress Alleges Several Vehicles Outside Its Amethi Office Vandalised : अमेठी : उत्तर प्रदेशमधील अमेठीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील गौरीगंजमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. तसेच, सीओसह स्थानिक पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या घटनेवरून काँग्रेसने भाजपावर आरोप केला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने आपल्या एक्स हँडलवर लिहिले की, "पराभवाच्या भीतीने भाजपा घाबरली आहे. अमेठीमध्ये प्रशासनाच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या डझनभर वाहनांची तोडफोड केली. जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तेथून हल्लेखोरांचा पाठलाग केला. मात्र पोलीस प्रत्येक वेळी प्रेक्षकच राहिले जणू काही त्यांच्याच इशाऱ्यावर घडत आहे."

याचबरोबर, उत्तर प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे की, "भाजपने आपला पराभव आधीच मान्य केला आहे, म्हणूनच त्यांनी अशा नीच आणि क्षुल्लक कृत्यांचा अवलंब केला आहे. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी कोणालाच घाबरत नाहीत." दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये काँग्रेसने किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. किशोरी लाल शर्मा यांच्याविरोधात भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या स्मृती इराणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर बसपाने या ठिकाणी नन्हे सिंह चौहान यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, येथे मुख्य लढत भाजपा आणि काँग्रेस यांच्यातच असल्याचे दिसून येत आहे.

सध्या या जागेवरून स्मृती इराणी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी या जागेवरून तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता. एकीकडे काँग्रेस आपला गमावलेला सन्मान परत मिळवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे भाजपा पुन्हा एकदा या जागेवर विजयावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :amethi-pcअमेठीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४