Join us  

IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 4:18 PM

Open in App
1 / 10

राजस्थान रॉ़यल्सने १० पैकी ८ सामन्यांत विजय मिळवून १६ गुण कमावले आहेत आणि ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. KKR ने एक सामना जास्त खेळून तितकेच गुण कमावले आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट हा सरस ठरतोय. RR ला उर्वरित चार सामन्यांत ( वि. दिल्ली ( ७ मे), वि. चेन्नई ( १२ मे), वि. पंजाब ( १५ मे) आणि वि. कोलकाता, १९ मे) एक विजय हा अव्वल चार मधील त्यांची जागा निश्चित करण्यासाठी पुरेसा आहे.

2 / 10

११ सामन्यांत कोलकाता नाईट रायडर्सनेही ८ विजय मिळवून सरस नेट रन रेटच्या जोरावर १६ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. पण, त्यांना उर्वरित ३ सामन्यांत किमान एक विजय मिळवणे गरजेचा आहे. त्यांना उर्वरित सामन्यात राजस्थान रॉयल्ससह ( १९ मे) मुंबई इंडियन्स ( ११ मे) व गुजरात टायटन्स ( १३) यांचा सामना करायचा आहे आणि यापैकी दोन सामने ते नक्की जिंकतील असा त्यांचा फॉर्म आहे.

3 / 10

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी समाधानकारक झाली आहे. त्यांनी ११ पैकी ६ सामने जिंकून स्वतःला शर्यतीत ठेवले आहे, परंतु सातत्याचा अभाव त्यांना मारक ठरतोय. त्यांना उर्वरित तीन सामने जिंकून स्वतःला तिसऱ्या क्रमांकावर ठेवता येईल. त्यांच्यासमोर गुजरात टायटन्स ( १० मे), राजस्थान रॉयल्स ( १२ मे) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( १८ मे ) यांचे आव्हान आहे. यापैकी किमान दोन सामने तरी त्यांना जिंकावे लागतील, परंतु नेट रन रेटही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावेल.

4 / 10

सनरायझर्स हैदराबाद १० सामन्यांत ६ विजय मिळवून १२ गुणांसह सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली या संघाने दमदार कामगिरी केली आहे, परंतु मागील काही सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली. त्यामुळे प्ले ऑफसाठी त्यांना उर्वरित चार सामन्यांत किमान दोन विजय मिळवावे लागतील. त्यांच्यासमोर मुंबई इंडियन्स ( ६ मे), लखनौ सुपर जायंट्स ( ८ मे), गुजरात टायटन्स ( १६ मे) आणि पंजाब किंग्स ( १९ मे) यांचे आव्हान आहे.

5 / 10

लखनौ सुपर जायंट्स सध्या ११ सामन्यांत ६ विजय मिळवून १२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. पण, त्याचवेळी त्यांचा नेट रन रेट हा -०.३७१ असा कमकुवत आहे. त्यामुळे त्यांना उर्वरित ३ सामन्यांत दोन विजय हे मोठ्या फरकाने मिळवावे लागतील. तीन सामने जिंकल्यास त्यांचा प्ले ऑफचा मार्ग सहज मोकळा होईल. त्यांना उर्वरित लढतीत सनरायझर्स हैदराबाद ( ८ मे), दिल्ली कॅपिटल्स ( १४ मे) व मुंबई इंडियन्सचा ( १७ मे) सामना करायचा आहे.

6 / 10

दिल्ली कॅपिटल्स सध्या ५ विजय व ६ पराभव अशा निकालामुळे गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. रिषभ पंत आणि सहकाऱ्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही आणि त्यांनी काही हातचे सामनेही गमावले. त्यांना उर्वरित तीन सामन्यांत विजय मिळवणे गरजेचे आहे, परंतु तरीही नेट रन रेट त्यांच्या मार्गात आडवा येऊ शकतो. त्याना राजस्थान रॉयल्स ( ७ मे) , रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( १२ मे) आणि दिल्ली कॅपिटल्स ( १४ मे) यांचा सामना करायचा आहे.

7 / 10

मागील तीन सामन्यांत विजय मिळवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम ठेवले आहे. त्यांना ११ सामन्यांत फक्त ८ गुण कमावता आले आहेत आणि उर्वरित तीन सामने जिंकून ते १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. मात्र, त्यांचं सर्व गणित हे इतरांवर अवलंबून आहे. त्यांना उर्वरित लढतीत पंजाब किंग्स ( ९ मे), दिल्ली कॅपिटल्स ( १२ मे) व चेन्नई सुपर किंग्स ( १८ मे) यांचा सामना करायचा आहे.

8 / 10

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूप्रमाणेच पंजाब किंग्सची अवस्था आहे. त्यांनाही ११ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवता आले आहेत आणि त्यांचा नेट रन रेटही कमकुवत आहे. त्यांनी काही सामने शेवटच्या चेंडूवर गमावले आहेत आणि त्याचा फटका त्यांना आता बसतोय. उर्वरित तीन सामन्यांत त्यांना ( बंगळुरू ( ९मे), राजस्थान ( १५ मे ) व हैदराबाद ( १९ मे)) मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्यानंतरही ते इतरांवर अवलंबून असतील.

9 / 10

मागील पर्वातील उपविजेत्या गुजरात टायटन्सची आयपीएल २०२४ मधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तेही RCB, PBKS प्रमाणे कात्रित सापडले आहेत. त्यांनी उर्वरित तीन सामने ( चेन्नई ( १० मे), कोलकाता ( १३ मे) व हैदराबाद ( १६ मे) ) जिंकले तरी इतरांवर त्यांची भीस्त आहे.

10 / 10

मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान संपले आहे. ११ सामन्यांत ३ विजयांसह ते दहाव्या क्रमांकावर आहेत आणि उरलेले तीन सामने जिंकून ते १२ गुणांपर्यंत पोहोचतील. त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबाद ( ६ मे), कोलकाता नाईट रायडर्स ( ११ मे) व लखनौ सुपर जायंट्स ( १७ मे) यांचे आव्हान आहे.

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स