घरांची खरेदी नेमकी कोणाकडून केली जातेय? 'ही' माहिती वाचून तुम्हीही चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 08:58 AM2022-06-16T08:58:21+5:302022-06-16T09:02:22+5:30

भारतात सामाजिक-आर्थिक क्षेत्रात नोकरदार वर्ग (सर्व्हिस क्लास) प्रभावशाली असून, घर खरेदीतही याच वर्गाचा वरचष्मा असल्याचे एका अहवालात आढळले आहे.

एका खासगी संस्थेने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. झपाट्याने शहरीकरण होत असल्यामुळे विभक्त परिवारांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

लोकसंख्याही वाढत आहे. हे दोन्ही घटक घरांच्या बाजारपेठेसाठी अनुकूल घटक आहेत. ‘ॲनारॉक’च्या अभ्यासातून घर खरेदीदारांत नवे कल आणि प्राधान्ये आढळून आली आहेत. त्यानुसार विकासक आपली धोरणे ठरवत आहेत.

सुधारणा व कोरोना साथीनंतर घरांची बाजारपेठ ही राहण्यासाठी घरे घेणारे लोकच चालवत असल्याचे आढळले आहे. गुंतवणूकदार आणि सटोडिये या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात बाहेर फेकले गेले आहेत. घरांच्या किमती सीमा-बंधित (रेंज-बाउंड) असल्याचेही या अहवालात आढळून आले आहे.

७९ टक्के प्राधान्य हे मध्यम ते उच्च श्रेणीतील घरांना खरेदीदार देत आहेत. ३८ टक्के २ बीएचके घरांचा एकूण विक्रीतील वाटा आहे. २६ टक्के ३ बीएचके घरांचा वाटा आहे.

६८ टक्के घर खरेदीदारांतील हिस्सेदारी नोकरदार वर्गाची आहे. हे प्रमाण सर्वाधिक आहे. २६ टक्के घर खरेदीतील हिस्सेदारी व्यावसायिक व धंदेवाईकांची. ९० टक्के घरांची बाजारपेठ राहण्यासाठी घरे घेणाऱ्यांनी व्यापली आहे.

१०% गुंतवणुकीसाठी, तर ९०% राहण्यासाठी.

६८ टक्के नोकरदार वर्ग, १८ टक्के बिझनेस, ०८ टक्के प्रोफेशनल्स, तर ६ टक्के इतर

१ आरके- ६ टक्के, १ बीएचके- १३ टक्के, २ बीएचके- ३८ टक्के, ३ बीएचके- २६ टक्के, ४ बीएचके- ९ टक्के, भूखंड- ७ टक्के, रो हाऊस- १ टक्के. (स्त्रोत : ॲनारॉक रिसर्च’ या संस्थेने केलेले संशोधन)