... म्हणून सेलिब्रिटी अन् खेळाडूंच्या ट्विटनंतर MS धोनी ट्विटरवर ट्रेंड

By महेश गलांडे | Published: February 4, 2021 10:24 AM2021-02-04T10:24:22+5:302021-02-04T10:38:35+5:30

दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात पॉप स्टार गायिका रिहानाने ट्विट केल्यानंतर ट्विटर वॉरच सुरु झाल्याचं दिसून येत आहे. रिहानाच्या ट्विटनंतर देशातील सेलिब्रिटी अन् खेळाडूंची ट्विट केले आहेत.

मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरपासून ते खिलाडीकुमार अक्षय कुमारपर्यंत अनेक सेलिब्रिटी अन खेळाडूंनी ट्विट केलंय.

इंडिया टुगेदर आणि इंडिया अगेन्स्ट प्रोपागांडा... असे म्हणत या खेळाडू आणि सेलिब्रिटींनी ट्विट केलंय. त्यानंतर, बरेच जण ट्विटरवर ट्रेंड झाले आहेत.

मात्र, टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज महेंद्रसिंह धोनीही ट्विटरवर ट्रेंड करत आहेत, विशेष म्हणजे धोनीने एकही ट्विट केलं नाही, तरीही तो ट्रेंड होत आहे.

पॉवर ऑफ सायलेंट असं म्हणत आणि धोनीनं ट्विट केलं नाही, हे लक्षात घेऊन अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत.

धोनीने ट्विट केलंय का, हॅशटॅग दिलेत का, कुणाला टॅग केलंय का, याचाही चर्चा ट्विटरवर रंगली असून अनेकजण एमएसचं ट्विटर हँडल तपासत आहेत.

आज सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी ट्रेंड करत आहेत, धोनीने काहीही ट्विट केलं नसतानाही तो ट्रेंड होत आहे

शेतकरी आंदोलनासंदर्भात धोनीने ना कुणाच्या समर्थनार्थ ट्विट केले, ना कुणाच्या विरोधात. तो नेहमीप्रमाणे शांत आहे

धोनीने ट्विट करु नये, अशीही इच्छा अनेक ट्विटर युजर्संने व्यक्त केलीय.

सेलिब्रिटींच्या ट्विटनंतर अनेकांच्या विकेट पडल्या, पण धोनी अद्यापही नाबाद उभा आहे, असं हे ट्विट

एका ट्विटर युजर्संने धोनीचा हा लेटेस्ट फोटो असल्याचे सांगात, हा फोटो ट्विट केलाय.

धोनीने एकही ट्विट न केल्यामुळे, चाहत्यांना त्याची ही भूमिका आवडली असून काहींनी सैन्यातील गणवेशात असलेल्या धोनीचा फोटो ट्विट केलाय.