नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 06:36 AM2024-05-20T06:36:00+5:302024-05-20T06:36:00+5:30

Weekly Horoscope: १९ मे २०२४ ते २५ मे २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी बुध आणि हर्षल मेषेत, रवी, गुरू आणि शुक वृषभेत, केतु कन्येत, प्लूटो मकरेत, तर शनी कुंभेत राहील. मंगळ, राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्राचे भ्रमण कन्या, तूळ, वृश्चिक आणि। धनू राशीतून राहील.

मोहिनी एकादशीनंतर सोमवारी प्रदोष, मंगळवारी श्री नृसिंह जयंती, गुरुवारी बुद्ध पौर्णिमा व वैशाख स्नान समाप्ती आहे. याशिवाय नारद जयंती, कुर्म जयंती असे काही सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत.

वृषभ राशीतील त्रिग्रही, शुक्रादित्य तसेच अन्य शुभ ग्रहयोगांमुळे आगामी काळ काही राशींना शुभ-लाभदायक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: संतोषातच परम सुख असते हे लक्षात ठेवावे लागेल. जीवनात जे काही परिश्रम व प्रयत्न करून प्राप्त झाले आहे ते काही कमी नाही. प्रत्येक कार्यात मग तो व्यापार असो किंवा विद्यार्थी जीवन असो, त्यात थोडा धिमेपणा असल्याचे जाणवेल तरी प्रगती होताना दिसून येईल. महत्वाच्या कार्यात थोडा त्रास संभवतो. वाणी संयमित ठेवावी लागेल, अन्यथा होत असलेली कामे बिघडू शकतात. आर्थिक दृष्ट्या मजबूत असल्याचे दिसत आहे. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी झालेली ओळख भविष्यात मोठ्या लाभास कारणीभूत ठरेल. प्रेम संबंधात गोडवा येईल. प्रेमिकेच्या सहवासात हसत खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. कुटुंबियांसह एखादा छोटासा प्रवास संभवतो.

वृषभ: कारकीर्द व व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यक्तिगत जीवनात सतर्क राहावे लागेल. कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागेल. जीवनात व्यस्तता राहील. विरोधक योजना व कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. क्रोधावर नियंत्रण ठेवा. लहान-सहान समस्या दुर्लक्षित करण्य ऐवजी त्यांचे निराकरण करा. व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी शुभचिंतकांचा सल्ला घेण्यास विसरू नका. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे. प्रेमिकेच्या भावना दुर्लक्षित करू नका.

मिथुन: जीवनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. इतरांच्या समस्यांचे निराकरण करताना स्वकीयांच्या भावना दुर्लक्षित करू नका. कारकीर्द असो किंवा व्यवसाय, योजनाबद्ध राहून कार्य करणे लाभदायी होऊ शकेल. अन्यथा होत असलेली कामे स्थगित होण्याची संभावना आहे. व्यवसायात कार्यक्षमतेनुसारच कार्य विस्तार करण्याचा विचार करावा. लोकांचे ऐकून कोणताही मोठा निर्णय घेण्याची चूक अजिबात करू नका. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कठीण प्रसंगी प्रेमिकाच आपली शक्ती होईल. महिलांचा बहुतांश वेळ धार्मिक कार्यात जाईल.

कर्क: आगामी काळ सौभाग्यदायी आहे. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना संधी मिळेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने रोजगाराशी संबंधित स्वप्न साकार होईल. धार्मिक-सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मान-सन्मान, पद, प्रतिष्ठा वृद्धि होईल. कामानिमित्त झालेले प्रवास लाभास कारणीभूत होतील. एखाद्या प्रिय किंवा प्रतिष्ठित व्यक्तीची भेट संभवते. जर एखाद्या व्यक्तीस विवाहासाठी मागणी घातली, तर ती त्यास मान्यता देईल. ज्या व्यक्ती आधीपासूनच प्रेम संबंधात आहेत त्यांचे नाते अधिक दृढ होईल. दाम्पत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील.

सिंह: कोणताही निर्णय क्रोधीत होऊन किंवा भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका, अन्यथा निव्वळ धनहानीच नाही तर वर्षानुवर्षांपासूनच्या नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. एखाद्या समस्येचे निराकरण करणे जमत नसेल तर एखाद्या शुभचिंतकाचा सल्ला घ्यावा. द्विधा मनःस्थिती असताना कोणताही निर्णय पुढे ढकलणे हितावह होईल. कार्यक्षेत्री वरिष्ठांची मेहेरनजर राहील. परदेशाशी संबंधित व्यापार करणाऱ्यांना अपेक्षित लाभ होऊ शकतो. कोणताही गैरसमज वाद न घालता संवादाने दूर करावा. वैवाहिक जीवन सुखद होईल.

कन्या: कारकिर्दीत-व्यवसायात अपेक्षित प्रगती होत असल्याचे दिसू लागेल. धनलाभ उत्तम होणार आहे. संचित धनाची वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांचे प्राप्तीचे नवीन स्रोत निर्माण होतील. ह्या दरम्यान कोणत्याही वापरात नसलेल्या वस्तूंचा आपणास त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ व कनिष्ठ ह्यांच्या साथीनेच कामे करावी लागतील. मुलांशी संबंधित एखादी चिंता आपणास सतावू शकते. व्यक्तिगत जीवनात सुद्धा वैवाहिक जोडीदाराशी वाद किंवा भांडण होऊ शकते. प्रणयी जीवनात सावधपणे पाऊले टाकावीत. आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करणे टाळावे, अन्यथा सामाजिक कलंक लागण्याची संभावना आहे. आठवड्याच्या अखेरीस दूरवरचे प्रवास संभवतात. प्रवासात आपल्या प्रकृतीची व सामानाची काळजी घ्यावी. त्याच बरोबर वाहन चालवताना सावध राहावे.

तूळ: आगामी कालावधी सुखदायी, सौभाग्यदायी व उन्नतीदायी होणार आहे. योजनाबद्ध कामे केल्यास यशस्वी होता येईल. कुटुंबात शुभ, मंगल, धार्मिक कार्य संपन्न होण्याची संभावना आहे. आर्थिक स्थितीत सामान्य झाली तरी सुधारणा नक्कीच होईल. कार्यक्षेत्री आवडते काम किंवा आवडत्या जागी बदली मिळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. जमीन-जुमल्याशी संबंधित वाद संपुष्टात येऊन त्यांच्या खरेदी-विक्रीतून लाभ होईल. इच्छा पूर्ण करण्यात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे किंवा मित्राचे विशेष सहकार्य प्राप्त होईल. दुकानदारी पेक्षा फुटकळ व्यापार करणाऱ्यांना जास्त लाभ होईल. असे असले तरी व्यापारात योजनाबद्ध कार्य केल्यास लाभ होण्याची संभावना वाढेल. प्रेम संबंधात प्रगल्भता येईल. विश्वास वाढेल. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

वृश्चिक: मन, कार्य व त्यात होणाऱ्या प्रगतीने बेचैन झाले असेल तर धीराने व विचारपूर्वक एखादे मोठे पाऊल उचलावे लागेल. कार्यक्षेत्री विरोधकांच्या षडयंत्रापासून सतर्क राहावे. दीर्घ किंवा लहान पल्ल्याचा प्रवास संभवतो. व्यवसायात धनलाभ झाला तरी खर्च वाढतील. अर्थात खर्च चांगल्या कामासाठीच होईल. व्यापार वृद्धीच्या निमित्ताने नवीन लोकांशी झालेली ओळख फायदेशीर होईल. प्रेमिकेशी झालेला गैरसमज नात्यात दुरावा निर्माण करू शकतो. कोणत्याही संशयास्पद स्थितीपासून दूर न राहिल्यास अचानक तणाव वाढू शकतो.

धनु: प्रवासातून निव्वळ धनलाभच होणार नाही तर प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख होईल. भविष्यात लाभदायी योजना बनू शकेल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठ यांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय वृद्धी करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहावे व त्या संबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्यावा. धार्मिक-सामाजिक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. कुटुंबीय किंवा मित्रांसह एखादी तीर्थयात्रा करण्याची संधी मिळेल. जमीन-जुमल्याची खरेदी-विक्री करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रेमसंबंध अजून दृढ होतील.

मकर: धार्मिक-सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबियांसह एखादा प्रवास संभवतो. मानसिक व शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे जाणवेल. थकबाकी मिळाल्याने आनंदित व्हाल. अशा कोणत्याही योजनेत की ज्यात जोखीम असल्याची शंका असेल त्यात पैसे गुंतवण्याचे धाडस करू नका. नोकरी करणाऱ्यांना प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत मिळतील. धन-संपत्तीत वाढ होईल. एखाद्या वरिष्ठ किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने जमीन-जुमल्याशी संबंधित वादाचे निराकरण होईल. कोणत्याही प्रकारे आपल्या प्रेमिकेच्या भावना दुर्लक्षित करू नका. कोणत्याही कठीण प्रसंगात वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी सावलीप्रमाणे ठाम उभा राहील.

कुंभ: कार्यक्षेत्री वरिष्ठ व कनिष्ठांचे विशेष सहकार्य लाभेल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना रोजगार मिळेल. एखादा व्यवसाय करत असाल तर अपेक्षित लाभ होऊन व्यवसाय वृद्धी होईल. कामानिमित्त केलेले प्रवास लाभदायी ठरतील. राजकारणी व्यक्तींना एखादे पद किंवा जवाबदारी मिळू शकते. एकंदरीत परिश्रम व प्रयत्नांचे पूर्ण फळ मिळणार आहे. परीक्षा - स्पर्धांची तयारी करत असणाऱ्यांना एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. घरी प्रिय व्यक्तीचे आगमन होईल. एखाद्या सहलीचे आयोजन होऊ शकते. दाम्पत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील.

मीन: कामानिमित्त सारखे प्रवास करावे लागण्याची संभावना आहे. कुटुंबाशी संबंधित समस्यांमुळे मन चिंतीत होईल. कार्यक्षेत्री विरोधक सक्रिय होतील. अशा परिस्थितीत लहान-सहान गोष्टींना थारा न देता ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. कार्यक्षेत्री सर्वांशी समन्वय साधणे हितावह होईल. व्यवसाय करत असाल तर कोणत्याही योजनेत विचारपूर्वकच आर्थिक गुंतवणूक करावी. कौटुंबिक जीवन, त्यात गैरसमज दूर करण्यासाठी वाद घालण्याऐवजी संवाद साधावा. कोणत्याही परिस्थितीत स्वजनांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते.