30 जूनपर्यंत शाळा बंदच, आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:02 PM2021-05-31T17:02:43+5:302021-05-31T17:13:41+5:30

आंध्र प्रदेश सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, 30 जूनपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, उन्हाळी सुट्टी वाढवून 30 जूनपर्यंत देण्यात आली आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून देशातील शाळा बंद आहेत. त्यातच, दुसरी लाटे आल्यामुळे परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले असून दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्यामुळे, जून महिन्यात शाळा सुरू होतील, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत होता.

आंध्र प्रदेश सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, 30 जूनपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, उन्हाळी सुट्टी वाढवून 30 जूनपर्यंत देण्यात आली आहे.

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन, आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांना 30 जूनपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.

ऑनलाईन क्लासेस 12 जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्यापही शिक्षण विभागाकडून ऑनलाईन क्लासेसंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य आणि मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य आणि मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप, रेडिओ, टेलिव्हीजन यांसारख्या माध्यमांद्वारे ऑनलाईन शिक्षणप्रणाली राबविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन जुलै महिन्यात करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलं नाही.

लवकरच बोर्डाकडून बारावीच्या परीक्षांबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. मात्र, 9 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणखी 15 दिवसांची वाढीव सुट्टी मिळाली आहे.