अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 04:42 PM2024-05-20T16:42:55+5:302024-05-20T16:43:48+5:30

ईडीने आप आणि त्यांच्या नेत्यांना मिळालेल्या परदेशी फंडातील अनियमिततेवर बोट ठेवले आहे.

Illegal funding to AAP from US, Canada, Arab countries; ED handed over the report to the Ministry of Home Affairs | अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नवी दिल्ली - दिल्लीच्या दारू घोटाळ्यात अडकलेल्या आम आदमी पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. कोर्टात सुरू असलेल्या या प्रकरणी आता ईडीने आम आदमी पार्टीला परदेशातून फंडिग होत असल्याचा खुलासा केला आहे. AAP ला २०१४ ते २०२२ या काळात ७.०८ कोटी परदेशी निधी मिळाला. मात्र हा फंड देणाऱ्या परदेशी देणगीदारांची नावे आणि अन्य माहिती लपवण्याचा आरोप ईडीने केला आहे. ईडीनं याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला रिपोर्ट पाठवला आहे.

ईडीने म्हटलं की, आम आदमी पार्टीला संयुक्त राज्य अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, सौदी अरब, संयुक्त अरब अमीरात, कुवैत, ओमान आणि अन्य देशातून देणगी मिळाली आहे. फंड ट्रान्सफर करण्यासाठी विविध देणगीदारांकडून एकच पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला आहे. ईडीने आप आणि त्यांच्या नेत्यांना मिळालेल्या परदेशी फंडातील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. यात पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक यांच्यासह अनेक नेत्यांवर २०१६ मध्ये कॅनडातून फंड रेजिंग प्रोग्रामसाठी जमवलेले पैसे व्यक्तिगत लाभासाठी दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. 

इतकेच नाही तर अनिकेत सक्सेना ( आप ओवरसीज इंडिया कॉर्डिनेटर), कुमार विश्वास ( तत्कालीन आप ओवरसीज इंडियाचे संयोजक), कपिल भारद्वाज आणि पाठक यांच्यासह विविध स्वयंसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पाठवण्यात आलेल्या ईमेलचा उल्लेख करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासणीत संयुक्त राज्य अमेरिका, कॅनडामध्ये फंड रेजिंग कॅम्पेनमधून केवळ पैसा गोळा केला नाही तर परदेशी फंडासाठी FCRA अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधापासून वाचण्यासाठी देणगीदारांची माहिती लपवली जात आहे असा आरोप ईडीने केला आहे.

Web Title: Illegal funding to AAP from US, Canada, Arab countries; ED handed over the report to the Ministry of Home Affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.