केदारनाथ येथील गुहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्यानधारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 07:12 PM2019-05-18T19:12:01+5:302019-05-18T19:29:43+5:30

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केदारनाथ तीर्थक्षेत्राला भेट दिली. यावेळी मोदींनी खास गढवाली वस्रे परिधान केली होती.

नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथील शिवशंकराच्या मंदिरात पूजा केली.

केदारनाथ येथील मंदिरात पूजा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

त्यानंतर नरेंद्र केदारनाथ परिसरात सुरू असलेल्या विकासकार्यांचाही आढावा घेतला.

केदारनाथ येथे पूजापाठ आणि परिसरातील विकासकामांची पाहणी झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी ध्यानधारणा करण्यासाठी पवित्र गुहेकडे प्रस्थान केले.

केदारनाथ येथील गुहेत आज रात्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणा करणार आहेत.