एंटीलिया! 27 मजले, 9 लिफ्ट, सिनेमा हॉल, हेलिपॅड; मुकेश अंबानींचं शाही घर पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 04:00 PM2022-12-27T16:00:26+5:302022-12-27T16:22:13+5:30

Mukesh Ambani Antilia : मुकेश अंबानी यांचं घर इतकं मोठं आहे की जवळपास 600 लोक येथे काम करतात.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं घर एखाद्या राजमहालापेक्षा कमी नाही. अंबानी कुटुंब ज्या घरामध्ये राहतं त्याला एंटीलिया असं म्हणतात. मुकेश अंबानींच्या या घराला जगातील सर्वात महागडं घर म्हटलं जातं.

मुकेश अंबानी यांचं घर इतकं मोठं आहे की जवळपास 600 लोक येथे काम करतात. मुंबईतील एंटीलिय 27 मजल्याचं असून जवळपास 4,00,000 स्केवर फूटमध्ये आहे. विशेष म्हणजे घरातील प्रत्येक खोलीचं इंटिरिअर हे वेगळं आहे.

शिकागोमध्ये राहणारे आर्किटेक्च पर्किन्स यांनी एंटीलिया डिझाईन केलं आहे. ऑस्ट्रेलियन कंस्ट्रक्शन कंपनी लॅग्टोंग होल्डिंगने हे तयार केलं आहे. हे पहिलं असं घर आहे जिथे हेलिपॅड आहे. या ठिकाणी तीन हेलिपॅडची सुविधा आहे.

2010 मध्ये एंटीलिया तयार झालं, त्यावेळी संपूर्ण जगात या घराची जोरदार चर्चा रंगली होती. 27 मजले असलेल्या या घरात पहिले सहा मजले फक्त पार्किंगसाठी तयार करण्यात आले आहे. जवळपास 168 कार पार्क करतात येतात. तसेच 50 सीटर सिनेमा हॉलही आहे.

मुकेश अंबानी आपल्या पूर्ण कुटुंबासह या घरामध्ये राहतात. एंटिलियामध्ये योगा स्टुडिओ, आईस्क्रिम रुम आणि तीन पेक्षा जास्त स्विमिंग पूल आहेत. घरात 9 लिफ्ट असून एक स्पा आणि मंदिर देखील आहे.

घराचं डिझाईन अशाप्रकारे तयार करण्यात आलं आहे जे 8 रिस्टर स्केलचा भूकंपाचा झटका देखील झेलू शकतं. रिपोर्टनुसार, मुकेश अंबानींचं घर हे 200 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 11 हजार कोटी रुपये खर्च आला आहे.

मुंबईमध्ये असलेलं मुकेश अंबानींचं हे घर तयार करण्यासाठी सात वर्षे लागले. पत्नी, मुली आणि आईसह मुकेश अंबानी हे टॉप फ्लोरच्या खाली असलेल्या फ्लोरवर राहतात. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.