PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 01:37 PM2024-05-05T13:37:41+5:302024-05-05T13:42:27+5:30

HAS Oshin Sharma : ओशिन शर्मा यांना त्यांच्या ग्लॅमरस लूकसाठीही ओळखले जाते.

हिमाचल प्रदेशातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओशिन शर्मा त्यांच्या ग्लॅमरस लूकसाठीही ओळखल्या जातात. त्या सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असतात.

ओशिन ह्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्या त्यांच्या प्रशासकीय कामामुळेही चर्चेत असतात. समाजसेवेला प्राधान्य देणाऱ्या ओशिन यांनी तरूणाईसमोर एक आदर्श ठेवला आहे.

त्या पेशाने अधिकारी असल्या तरी त्यांची शैली एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. त्यांना अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली पण कुटुंबीयांचा विरोध पाहता त्यांनी नकार दिला.

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी सर्वाधिक काळ शिमला येथे घालवला. त्यांचे वडील भुवनेश शर्मा हे नायब तहसीलदार पदावर होते आणि आई कांगडा येथे अधिकाऱ्याची पीए होती.

घरात सुसंस्कृत वातावरण असल्यामुळे ओशिन यांना याचा चांगलाच फायदा झाला. ओशिन यांचे डॉक्टर बनायचे स्वप्न होते. महाविद्यालयीन काळात त्यांना राजकारणात रस होता.

त्या कॉलेजच्या राजकारणात सक्रिय देखील होत्या. पण कुटुंबीयांच्या सल्ल्यानंतर त्यांनी नागरी सेवेकडे मोर्चा वळवत या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले.

त्यांच्या कुटुंबीयांच्या सल्ल्यानुसार, ओशिन यांनी नागरी सेवेत रुजू होण्याचे ध्येय ठेवले आणि त्यानंतर त्याची तयारी सुरू केली. पंजाब विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि आपल्या ध्येयाची तयारी सुरूच होती. नागरी सेवांच्या तयारीसाठी त्या अनेक तास अभ्यास करत असत.

ओशिन शर्मा सांगतात की, त्यांनी अनेकदा सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिली पण त्यांची निवड झाली नाही. एकदा त्यांना नागरी सेवेच्या परिक्षेत अपयश आले होते.

केवळ पाच गुण कमी आल्याने त्यांना यशापासून दूर राहावे लागले. मात्र त्यांनी हार न मानता अखेर २०१९ मध्ये यश मिळवले आणि त्यांची निवड बीडीओसाठी झाली.

ओशिन यांना बीडीओ म्हणून पोस्ट करण्यात आले तेव्हाही त्यांची तयारी सुरूच होती. त्यांच्या समर्पणाचे आणि परिश्रमाचे फळ म्हणजे हिमाचल प्रशासकीय सेवेची परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊन त्यांनी दहावी रँक मिळवली.

ओशिन शर्मा ह्या सध्या हिमाचल प्रदेशात तैनात आहेत. त्या सहाय्यक आयुक्त बीडीओ या पदावर कार्यरत आहेत.