Facebook Server Down: 'ट्विटर'ला अच्छे दिन, व्हायरल झाले 'लय भारी' मिम्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 10:20 AM2021-10-05T10:20:29+5:302021-10-05T10:47:12+5:30

सोमवारी रात्री सव्वानऊ वाजल्यापासून अचानक फेसबुक, इन्स्टा, Whats app डाऊन झाल्याने जगभरातील युजर्संनी झुकरबर्गच्या कंपन्यांची खिल्ली उडविण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला.

सोशल मीडिया आणि त्यातली त्यात फेसबुक, व्हॉट्असप, इंस्टाग्राम हे जणू नित्यनियमाचे जवळचे सहकारी बनले आहेत. त्यामुळे, इंटरनेट डाऊन किंवा या एपवर काहीकाळ तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास तो चर्चेचा विषय बनतो

सोमवारी रात्री सव्वानऊ वाजल्यापासून अचानक फेसबुक, इन्स्टा, Whats app डाऊन झाल्याने जगभरातील युजर्संनी झुकरबर्गच्या कंपन्यांची खिल्ली उडविण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला.

फेसबुक डाऊन झाल्यामुळे अनेकांनी ट्विटरवर आपला मोर्चा वळवला. तसेच, येथून फेसबुक, इंस्टा आणि व्हॉट्सअप बंद झाल्याचाही ट्रेंड सुरू झाला.

या ट्रेंडनंतर मेनस्ट्रीम मीडियातही बंदच्या बातम्या झळकल्या. त्यामुळे, आता हे कधी सुरू होईल, याचीच चर्चा सगळीकडे रंगली होती.

फेसबुक अचानक बंद पडल्याने झुकरबर्गसह या अॅपबाबतचे अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. ट्विटरवरुन या मिम्सचा ट्रेंडही सुरू झाला.

एका फोटोमध्ये तर वायरींच्या जंजाळामध्ये मार्क झकरबर्ग घुसून समस्या शोधत असल्याचे दाखविण्यात आले आहे.

फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टा गेल्या दोन तासांपासून बंद पडले आहे. एवढा वेळ बंद पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या आधीही काही काळासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप बंद झाले होते. परंतू हा काळ अर्धा किंवा तासभर एवढाच होता. परंतू यावेळी तब्बल सहा तासानंतर फेसबुक सूरू झालंय.

फेसबुक बंद झाल्यामुळे मार्क झुकरबर्गची होणारी धडपड या फोटोतून सांगण्याचा प्रयत्न केलाय.

अजय देवगणचा गोलमाल चित्रपटातील हा एटीट्यूड लूक सध्या ट्विटरचा असल्याचं मिम्स नेटवर व्हायरल झालं होतं

किती वाट पहायची रे फेसबुक सुरू व्हायची, कंटाळ आलाय आता, उभं राहून, बसलो आता लोटलो, असंच हे मिम्स सांगत आहे

फेसबुक बंदमुळे ट्विटरला अच्छे दिन आले, नेटीझन्स सगळे ट्विटरकडेच वळाले

अमरिष पुरी यांना मार्क झुकरबर्ग बनवून हे मिम्स बनविण्यात आलंय, किती वेळ घेतला तुम्ही परत येण्यासाठी असं सांगायचंय या फोटोतून

फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअपला तडा गेला, आता ट्विटरच रुबाबात दिसला

विशेष म्हणजे या डाऊनच्या काळात टेलिग्रामही सुरू असल्यानं अनेकांनी टेलिग्रामवरुन कनेक्टीव्हीटी साधली, टेलिग्राम लय भारी असंही काहींनी म्हटलं

रात्री सव्वा नऊच्या सुमारास फेसबुक डाऊन झाल्यामुळं गावच्या मंडळींचा रुबाब पाहण्यासारखा होता, अंतिम सत्य हेच.. असंच त्यांना सांगायचंय.

मार्क झुकरबर्गचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला, हे मिम्स आज सकाळी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये येऊन पडले होते, तोपर्यंत सगळं पुन्हा कार्यरत झालं.