CoronaVirus News : धोका वाढला! एप्रिलमध्ये कोरोनामुक्त झालेल्या 'या' 5 राज्यांमध्ये व्हायरसचा पुन्हा शिरकाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 10:41 AM2020-06-10T10:41:07+5:302020-06-10T10:59:02+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील पाच राज्य एप्रिलमध्ये कोरोनामुक्त झाली होती, मात्र मेमध्ये आता पुन्हा एकदा या राज्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहेत.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशातील रुग्णांची संख्या 276583 वर गेली असून आतापर्यंत तब्बल 7745 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशामध्ये एका दिवसात कोरोनाचे तब्बल 9985 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 279 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे.

देशात विविध ठिकाणी 133632 जणांवर उपचार सुरू आहेत. 135206 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक असलेले सर्व उपाय केले जात असून काळजी घेतली जात आहे. मात्र याच दरम्यान एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.

देशातील पाच राज्य एप्रिलमध्ये कोरोनामुक्त झाली होती, मात्र मेमध्ये आता पुन्हा एकदा या राज्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहेत.

कोरोनामुक्त झालेल्या या पाच राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपुर, त्रिपुरा आणि मिझोरम यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये प्रवासी मजूर आणि घरी परतलेल्या लोकांमुळे कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याची माहिती मिळत आहे.

अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोरममध्ये कोरोनाचे काही रुग्ण आढळून आले होते. मात्र उपचारानंतर ते बरे झाले. त्यानंतर ही पाच राज्ये कोरोनामुक्त घोषित करण्यात आली होती.

1 मे पासून स्थलांतरित मजूर आणि लोकं घरी परतू लागले. याचाच परिणाम हा या पाचपैकी चार राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आणि आता रुग्ण वाढत आहेत.

पाच राज्यांमध्ये गेल्या 9 दिवसांत 1134 नवीन रुग्ण सापडले आहेत. ही संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. दिलासादायक बाब म्हणजे या पाच राज्यांमध्ये कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही आहे.

1 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. 17 एप्रिल रोजी राज्य कोरोनामुक्त झालं. 24 मे रोजी पुन्हा कोरोना रुग्ण समोर आला. 9 दिवसांत 53 नवीन रुग्ण सापडले.

25 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. 19 एप्रिल रोजी गोवा कोरोनामुक्त झालं. मात्र 14 मे रोजी पुन्हा कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर 31 मेपर्यंत राज्यात 70 कोरोनाबाधित होते. आतापर्यंत राज्यात 260 रुग्ण आहेत.

23 मार्च रोजी मणिपूरमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला. 20 एप्रिल रोजी राज्या कोरोनामुक्त असल्याचं घोषित करण्यात आलं. त्यानंतर 14 मे रोजी पुन्हा संक्रमण होण्यास सरुवात झाली. आता 210 कोरोनाबाधित आहेत.

6 एप्रिल रोजी पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर 23 एप्रिल रोजी राज्य कोरोनामुक्त झालं. मात्र 2 मे रोजी पुन्हा कोरोनाचा प्रसार झाला. आता राज्यात 570 कोरोनाग्रस्त आहेत.

24 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला. 27 एप्रिल रोजी राज्य कोरोनामुक्त झाल्याचे जाहीरही करण्यात आले. मात्र 1 जूनला पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. सध्या राज्यात 41 कोरोना रुग्ण आहेत.

देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.