सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 14:45 IST2024-04-30T14:37:12+5:302024-04-30T14:45:27+5:30

जावई चक्क सासूच्या प्रेमात पडला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती कुटुंबीयांना मिळताच सासऱ्याने थेट या दोघांचं लग्न लावून दिलं आहे.

marriage of sas and damad in banka after wife death father in law love-marriage | सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं

फोटो - zeenews

झारखंडच्या बांकामध्ये एक अजब घटना समोर आली आहे. जावई चक्क सासूच्या प्रेमात पडला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती कुटुंबीयांना मिळताच सासऱ्याने थेट या दोघांचं लग्न लावून दिलं आहे. वर्षभरापासून दोघांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. जावयाचं लग्न झालं होतं. पण वर्षभरापूर्वीच त्याच्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर त्याचे सासूसोबत प्रेमसंबंध सुरू होते. 

सासरच्या मंडळींना प्रेम प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने गावातच त्यांचं लग्न लावण्यात आलं. गावकऱ्यांसमोरच दोघांनी एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं. बांका पोलीस स्टेशन हद्दीतील छत्रपाल पंचायत हद्दीतील हीर मोती गावातील 55 वर्षीय दिलेश्वर दर्वे यांची पत्नी गीता देवीचे (45) जावई सिकंदर यादव याच्याशी प्रेमसंबंध होते. 

गीता देवी यांच्या मुलीचं 20 वर्षांपूर्वी सिकंदर यादवसोबत लग्न झालं होतं. वर्षभरापूर्वी सिकंदर यादवच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. ज्याला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर सिकंदर यादव आपल्याच सासूच्या प्रेमात पडला. घरच्या मंडळींना जावई आणि सासूवर संशय आला. त्यांनी ही माहिती स्थानिक ग्रामस्थांना दिली. यानंतर घटनास्थळी गर्दी झाली. 

सासूने गावकऱ्यांसमोर जावयावर असलेलं प्रेम व्यक्त केलं. त्यावर सिकंदर यादवचे सासरे आणि गावकऱ्यांनी मिळून सिकंदर यादव आणि गीता देवी यांचं लग्न लावून दिलं. त्यानंतर सर्वांसमोर लग्नसोहळा पार पडला. यानंतर सासू जावयासोबत निघून गेली. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. 
 

Web Title: marriage of sas and damad in banka after wife death father in law love-marriage

टॅग्स :marriageलग्न