वांद्रे येथे अवतरली शिर्डी, शिर्डीतून साईबाबांच्‍या पादुका मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 05:52 PM2017-08-25T17:52:19+5:302017-08-25T17:55:25+5:30

वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाने यावर्षी शिर्डी साईबाबांच्‍या समाधीच्‍या शताब्‍दी निमित्‍त साईबाबांच्या समाधी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती उभारली आहे.

शिर्डीतून साईबाबांच्‍या पादूकाही खास भक्‍तांच्‍या दर्शनासाठी दाखल झाल्या आहेत.

शिर्डीतील साईबाबांचे समाधी मंदिराची ही प्रतिकृती सुमारे 60 फुट उंचीची साकारण्‍यात आली आहे.

साईबाबांवर श्रध्‍दा असणारे लाखो भाविक मुंबई परिसरात आहेत. तसेच मुंबईत अनेक पदयात्री मंडळेही मोठया प्रमाणात आहेत. या सर्वांना खास आमंत्रण या निमित्ताने देण्‍यात आले आहे.

गणेशोत्‍सवात यावर्षी मोठयाप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतील हे लक्षात घेऊन मंडळाचे पदाधिकरी तयारीला लागले आहेत.