महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा लेटेस्ट सर्व्हे; कुणाला किती जागा मिळतायत? जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 10:58 PM2023-07-05T22:58:23+5:302023-07-05T23:08:57+5:30

Loksabha Election Survey: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एक सर्व्हे करण्यात आला आहे. हा सर्वे आतापर्यंतचा सर्वात ताजा सर्व्हे आहे. यातून महाराष्ट्राची सद्य स्थिती समोर आली आहे.

येणाऱ्या वर्षात अर्थात 2024 मध्ये संपूर्णदेशात लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी भाजप, काँग्रेससह सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. यामुळे आता विरोधकांनी एकत्र येत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.

नुकतेच बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधकांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास 15 विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढविण्याचे ठरवले. मात्र, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने विरोधकांच्या ऐक्याला मोठा धक्का बसला असला तरी, याचा फारसा परिणाम होणार नाही, असा विरोधी पक्षांचा दावा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एक सर्व्हे करण्यात आला आहे. हा सर्वे आतापर्यंतचा सर्वात ताजा सर्व्हे आहे. यातून महाराष्ट्राची सद्य स्थिती समोर आली आहे. मात्र हा सर्व्हे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उद्भवलेल्या संकटापूर्वीचा आहे.

हा सर्व्हे, टाइम्स नाऊ नवभारत आणि ईटीजीने केला. यात, महाराष्ट्रातील जनतेला, आपण लोकसभा निवडणुकीत कुणाला मतदान करणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यात सर्वाधिक लोकांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए वर विश्वास व्यक्त केला आहे.

या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला महाराष्ट्रात 22-28 जागा मिळू शकतात. तर दुसऱ्या बाजूस महा विकास आघाडीला 18-22 जागा मिळू शकतात. तसेच, इतरांच्या खात्यात एक ते दोन जागा जाण्याचा अंदाज आहे.

महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रात रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो. हा निवडणूक सर्व्हे या राजकीय घडामोडीपूर्वीचा आहे.

यापूर्वी, शिवसेना आणि भाजप एनडीएचा भाग होते. तर आता एनसीपीमध्ये फूट पडल्यानंतर, अजित पवारही यात सहभागी झाले आहेत. तर, एमव्हीएमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस, एनसीपीचा (शरद पवार गट) समावेश आहे.

देशभर कुणाला किती जागा? - जर देशात आता लोकसभा निवडणुका झाल्या, तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 285-325 जागा मिळू शकतात, असे संबंधित सर्व्हेतून समोर आले आहे. अर्था देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार सत्तेवर येऊ शकते. याशिवाय काँग्रेस आघाडीला 111-149 जागा मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय, टीएमसीला 20-22, वायएसआरसीपीला 24-25, बीजेडीला 12-14, बीआरएसला 9-11, आम आदमी पार्टीला चार ते सात, समाजवादी पक्षाला चार से आठ आणि इतरांना 18-38 जागा मिळू शकतात.

जागांच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा चांगले प्रदर्शन करू शखते. भाजपला उत्तर प्रदेशात 68-71 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला केवळ एक अथवा दोन जागांवरच समाधान मानावे लागू शकते. याशिवाय, सपा चार ते आठ, तर बसपा शून्य ते एक जागा जिंकू शकते.