Maharashtra Rain: कमी दाबाचा पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 15:50 IST2025-08-25T15:39:45+5:302025-08-25T15:50:17+5:30

How low pressure area form: महाराष्ट्रात गेले काही दिवस मुसळधार पाऊस झाला. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मुंबई आणि राज्याच्या काही भागात पाऊस सुरू झालाय... बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्रातील पावसाचे कनेक्शन कसं?

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडण्याची अंदाज आहे, हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. वाचलं असेल. पण, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पाऊस कसा पडतो? हा कमी दाबाचा पट्टा कसा तयार होतो? असा प्रश्नही तुमच्या मनात आलाच असेल... त्याचंच उत्तर समजून घ्या.

सगळ्यात आधी हे जाऊन घेऊ की, कमी दाबाचा पट्टा कसा तयार होतो. तर जेव्हा एखादा भूभाग किंवा समुद्राचा पृष्ठभाग सूर्याच्या उष्णतेमुळे प्रचंड तापतो, तेव्हा त्यावरील हवा देखील तापते. मग हवा गरम होते. त्यामुळे होतं असं की, ती थंड हवेपेक्षा हलकी होते. त्यानंतर ती प्रसरण पावते आणि वरच्या म्हणजे आकाशाच्या दिशेने जाते.

आता समुद्रावरील ही हवा गरम वर गेल्यामुळे तिथली हवेचे प्रमाण कमी होते. ज्याला हवेची घनता कमी होणे म्हणतात. यामुळे होतं असं की, त्या विशिष्ट भागात हवेचा दाब सभोवतालच्या प्रदेशापेक्षा कमी होतो. यालाच 'कमी दाबाचे क्षेत्र' अथवा 'कमी दाबाचा पट्टा असं म्हटलं जातं.

आता महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे हवा नेहमी जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहते. त्यामुळे आजूबाजूच्या थंड आणि जास्त दाबाच्या प्रदेशातील हवा वेगाने या कमी दाबाच्या क्षेत्राकडे खेचली जाते, ज्याला आपण वारे म्हटतो.

आता पुढचा मुद्दा... बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असताना काय घडलं? मान्सून काळात बंगालच्या उपसागरामध्ये पाण्याचे तापमान २६.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. या उष्ण पाण्यामुळे त्यावरील हवा तापते.

हवा गरम होते आणि समुद्राच्या पाण्याची वाफ (ज्याला बाष्प म्हटलं जातं) मोठ्या प्रमाणात तयार होते. ही बाष्पयुक्त आणि उष्ण हवा हलकी असल्यामुळे वेगाने वर जाते. ही हवा जसजशी वरच्या दिशेला जाते, तसतशी ती थंड होते आणि त्यातील बाष्पाचे रूपांतर ढगांमध्ये होते.

ही प्रक्रिया घडत असताना मोठ्या प्रमाणात सुप्त उष्णता बाहेर टाकली जाते. ज्याचा परिणाम असा होतो की, हवा आणखी तापते आणि अधिक वेगाने वर जाते, ज्यामुळे पृष्ठभागावरील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होते. त्यानंतर हवामान प्रणाली तयार होते, जी वाऱ्यांच्या चक्राकार हालचाल म्हणूनही ओळखली जाते. ही वादळासारखी दिसते.

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा किंवा तीव्र कमी दाबाचा पट्टा (Depressions) साधारणपणे पश्चिम-वायव्य दिशेने भारताच्या भूभागावरून प्रवास करतो. त्यांचा प्रवासाचा मार्ग हा ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्राकडे असतो.

सगळं जे घडतं ते प्रकारे एक नैसर्गिक इंजिन म्हणता येईल किंवा व्हॅक्यूम क्लिनर. हा पट्टा जमिनीवरून पश्चिमेकडे सरकतो, तसं तो प्रचंड शक्तीने अरबी समुद्रातील बाष्पयुक्त नैऋत्य मोसमी वाऱ्यांना खेचून घेतो. यामुळे या वाऱ्यांचा वेग आणि बाष्प वाहून नेण्याची क्षमता खूप वाढते.

सगळं जे घडतं ते प्रकारे एक नैसर्गिक इंजिन म्हणता येईल किंवा व्हॅक्यूम क्लिनर. हा पट्टा जमिनीवरून पश्चिमेकडे सरकतो, तसं तो प्रचंड शक्तीने अरबी समुद्रातील बाष्पयुक्त नैऋत्य मोसमी वाऱ्यांना खेचून घेतो. यामुळे या वाऱ्यांचा वेग आणि बाष्प वाहून नेण्याची क्षमता खूप वाढते.