Alert! 800 वर्षांपासून बर्फाखाली उसळतोय लाव्हारस, वैज्ञानिकांनी दिला इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 04:18 PM2020-04-11T16:18:24+5:302020-04-11T16:59:17+5:30

हा द्वीप पूर्णपणे समुद्राने वेढलेला आहे. इथे पृथ्वीखाली अशी ज्वालामुखी सिस्टीम आहे जी जवळपास दर 1000 वर्षांनी अ‍ॅक्टिवेट होते.

यूरोपमध्ये एक देश आहे आइसलॅंड. हा जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या भागांपैकी एक आहे. कारण इथे सगळीकडे केवळ बर्फाची चादर दिसते. मिड-अटलांटिक रिजमध्ये एक असंच ठिकाण आहे जिथे अनेक सक्रिय ज्वालामुखी आहेत. तर संपूर्ण आयलंडवर 30 सक्रिय वॉल्कॅनो सिस्टीम आहे. यातीलच एक आहे रेकेजेनस. (Image Credit : DailyMail)

हा द्वीप पूर्णपणे समुद्राने वेढलेला आहे. इथे पृथ्वीखाली अशी ज्वालामुखी सिस्टीम आहे जी जवळपास दर 1000 वर्षांनी अॅक्टिवेट होते. वैज्ञानिकांनी सांगितले की, आता ती वेळ जवळ आली आहे जेव्हा येथील ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर निघेल. (Image Credit : extremeiceland.is)

रेकेजेनस येथील ज्वालामुखी शेवटचे 10व्या शतकात सक्रिय झाले होत. तेव्हा जवळपास त्यातून 300 वर्षांपर्यंत विस्फोट होत राहिले आणि उकडता लाव्हारस बाहेर येत राहिला. (Image Credit : pinterest.com)

आता वैज्ञानिक म्हणत आहेत की, साधारण 800 वर्षे शांत राहिल्यानंतर आता हा परिसर जागा होत आहे. जर या प्रायद्वीपावर ज्वालामुखींचा विस्फोट झाला तर जमिनीला 8 किलोमीटरपर्यंतची भेग पडू शकते. याआधी जेव्हा ज्वालामुखीचा विस्फोट झाला होता तेव्हा 50 वर्ग किलोमीटरचा परिसर प्रभावित झाला होता. (Image Credit : dailymail.co.uk) (प्रातिनिधीक छायाचित्र)

आता याने काय धोका होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. इतक्या मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी फुटतील तर आजूबाजूचं जीवन संपेल असाही विचार तुम्ही केला असेल. (Image Credit : carbonbrief.org)(प्रातिनिधीक छायाचित्र)

जवळच ग्रिंडाविक परिसर आहे. जर लाव्हा त्याकडे वाहत गेला तर धोका आहे. तिथे एक जियोथर्मल पावर प्लांटही आहे. वॉटर सप्लाय तर प्रभावित होईलच.खूप रस्तेही बंद होतील. (Image Credit : .flickr.com)

आइसलॅंडचं एक इंटरनॅशनल एअरपोर्ट केफ्लेविक या ठिकाणापासून केवळ 15 किलोमीटर अंतरावर आहे. जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर लाव्हारस येथील विमानांना नष्ट करण्याचा धोका आहे. आइसलॅंडला येणारी-जाणारी प्रत्येक इंटरनॅशनल फ्लाइट केफ्लेविक येथूनच जाते.

आइसलॅंड जिओ सर्व्हेनुसार, जसं 800 वर्षांपूर्वी झालं होतं तसंच झालं तर एअरपोर्टच्या रनवेवर दोन सेंटीमीटरचा राखेचा थर जमा होईल. याने सर्व उड्डाणे रोखली जातील. (प्रातिनिधीक छायाचित्र)

साधारण एक दशकाआधी म्हणजे 2010 मध्ये आइसलॅंडमधीलच Eyjafjallajökull मधे अचानक एक ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यावेळी साधारण तीन हजार भूकंप नोंदवण्यात आले होते.

सगळीकडे राख इतकी झाली होती की, यूरोपमध्ये साधारण एक महिन्यापर्यंत विमान प्रवास बंद होता. त्यावेळी तीन महिन्यांपर्यंत लाव्हा निघत होता. तर रेकेजेनसमधून 300 वर्ष लाव्हा बाहेर येऊ शकतो, त्यामुळे यूरोप धोक्यात आहे.