बाबो! झाडाला लागलेले अडीच-तीन किलोचे लिंबू पाहून गावकऱ्यांची उडाली झोप; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 12:34 PM2020-12-27T12:34:53+5:302020-12-27T12:47:03+5:30

हरियाणातील हिसारच्या मंडी आदमपूर गावच्या विजेंद्र थोरी यांच्या शेतात एक निसर्गाचा वेगळाच चमत्कार पाहायला मिळाला आहे. या झाडाला पपईच्या वजनाचा लिंबू लागला आहे. या लिंबाच्या झाडाचे फोटो पाहून तुम्ही हैराण व्हाल.

विजेंद्र यांच्या शेतातील हा लिंबू पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येत आहेत आणि स्वतःबरोबर लिंबू घेऊनसुद्धा जात आहेत. विजेंद्र थोरी यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी निवेदन दिलं आहे.

विजेंद्र उर्फ विजय थोरी यांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या ७ एकर जमिनीवर पंजाबवरून झाडं आणून लावली होती. याशिवाय त्यांनी मोसंबी, लिंबू ही झाडं सुद्धा लावली होती. मोसंबीपेक्षा मोठ्या आकाराचा लिंबू या झाडावर आला ही विशेष गोष्ट आहे.

जेव्हा ग्रामस्थांनी झाडापासून लिंबू तोडून काट्यावर ठेवला तेव्हा त्याचे वजन 2 किलो 464 ग्रॅम होते. शेतकरी थोरी यांनी सांगितले की, ''वनस्पतीला सेंद्रिय खत पूर्णपणे देण्यात आले आहे. म्हणूनच लिंबाचे वजन खूप वाढले आहे. झाडावरील लिंबू पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी पोहोचले आहेत. ग्रामीण भागातील लोकांनी या लिंबाचे फोटोसुद्धा काढले आहेत.''

इतके सारे मोठे लिंबू पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सेंद्रिय खताच्या वापरामुळे लिंबाचा आकार वाढला आहे, असं शेतकरी विजेंद्र थोरी यांचे म्हणणे आहे. शेतकरी विजेंद्र उर्फ ​​विजय थोरी यांचा असा दावा आहे की आजपर्यंत अशा प्रकारचे लिंबू सापडले नाहीत. काहीजणांच्या मते असे लिंबू इस्राईलमध्ये आढळतात.

शेतकऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अनेक प्रकारचे लिंबू पाहिले पण हा कोणत्या प्रकारचा लिंबू आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही.

या प्रकारच्या लिंबाचा वापर किडनी स्टोनचे उपचार करण्यासाठी वापरला जातो. असं अनेकांचे म्हणणं आहे.