"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 12:32 PM2024-05-07T12:32:17+5:302024-05-07T12:32:43+5:30

"...त्यांना मत न देऊन चूक दाखवून द्या", रेणुका शहाणेंचं ट्वीट चर्चेत

renuka shahane tweet after company ad saying marathi people not welcome goes viral said dont give vote to such people | "मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

काही दिवसांपूर्वीच एका कंपनीच्या जाहिरावरून वादंग निर्माण झाला होता. या कंपनीच्या जाहिरातीत मराठी लोकांनी नोकरीसाठी अर्ज करू नये, असं सांगण्यात आलं होतं. मुंबईत असलेल्या या कंपनीच्या एचआर रिक्रूटरच्या लिंक्डइन प्रोफाइलवरुन ही जाहिरात करण्यात आली होती. मुंबईतच मराठी माणसाला नोकरी नाकारल्याने नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला होता. त्यानंतर अनेक कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला होता. आता रेणुका शहाणेंनी याबाबत ट्वीट केलं आहे. 

आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर रेणुका शहाणेंनी X अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी मराठी भाषा आणि मराठी भाषिक लोकांना कमी लेखणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. 

रेणुका शहाणेंनी ट्वीटमध्ये काय म्हटलं? 

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका 🙏🏽

मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका 🙏🏽

ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका 🙏🏽

कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही. पण, जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत. अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे...

रेणुका शहाणेंचं हे ट्वीट व्हायरल झालं आहे. त्यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, गुजरातमधील एका फ्रीलान्स एचआर रिक्रूटरने ग्राफिक डिझायनरच्या भूमिकेसाठी मुंबईत नोकरीची जाहीरात तिच्या लिंक्डइन प्रोफाईलवर शेअर केली होती.  पण, जाहीरातीमध्ये एचआरने "येथे मराठी लोकांचे स्वागत नाही" असे लिहिले होते. त्यामुळे संताप व्यक्त केला जात होता. 

Web Title: renuka shahane tweet after company ad saying marathi people not welcome goes viral said dont give vote to such people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.